Jammu-Kashmir Update: जम्मू-काश्मीरच्या राजौरीत दहशतवादी हल्ला, 3 नागरिक ठार तर10 गंभीर जखमी
तीन मृतांपैकी सतीश आणि दीपक अशी दोघांची नावे आहेत.
जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu-Kashmir) राजौरी (Rajouri) जिल्ह्यातील डांगरी भागात झालेल्या गोळीबारात किमान तीन नागरिक ठार झाले, तर 10 जण गंभीर जखमी झाले. 7.15 च्या सुमारास, राजौरी जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शाळेजवळील अप्पर डांगरी भागात गोळीबाराची घटना घडली, ज्यात एक महिला आणि एका मुलासह 10 हून अधिक लोक जखमी झाले. तीन मृतांपैकी सतीश आणि दीपक अशी दोघांची नावे आहेत. इतरांवर राजौरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत. जीएमसी, राजौरी येथे उपचार घेत असलेल्या वाचलेल्या व्यक्तीच्या प्राथमिक चौकशीवरून असे सूचित होते की हा दहशतवादी हल्ला होता, ज्यात दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गोळीबार 2 सशस्त्र हल्लेखोरांनी केला होता. सध्या पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी जम्मूचे एडीजीपी मुकेश सिंह म्हणाले, 'परिसरातील डुंगरी गावात कथित गोळीबाराची माहिती मिळाली आहे. हा गोळीबार 2 अज्ञात लोकांनी केला आहे. यामध्ये काही लोक जखमी झाले आहेत, तर काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हेही वाचा Andhra Pradesh: गुंटूर जिल्ह्यात TDP नेते एन चंद्राबाबू नायडू यांच्या जाहीर सभेत झालेल्या चेंगराचेंगरीत 3 जणांचा मृत्यू
पोलीस आणि लष्कराचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. या प्रकरणी राजौरीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मेहमूद यांनी सांगितले की, जखमींच्या शरीरावर अनेक गोळ्यांच्या जखमा आहेत. या दहशतवादी हल्ल्यातील मृत आणि जखमी लोकांची माहिती पोलिसांनी शेअर केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश कुमार, दीपक कुमार आणि प्रीतम लाल यांचा मृत्यू झाला आहे. तर सरोज बाला, शुभ शर्मा, आरोशी, रोहित पंडित, पवन कुमार, सुशील कुमार आणि शिवपाल हे गंभीर जखमी आहेत.