Share Market News: आठवड्याच्या सुरूवातीलाच शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स ७०० अंकांनी घसरला

परिणामी गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

Indian Stock Market | (Photo credit: archived, edited, representative image)

Share Market News: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी शेअर बाजारात (stock market) मोठी घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी घसरला. निफ्टी 22,000 अंकांच्या खाली आला. अनेक दिग्गज कंपन्यांच्या शेअर(Share)चे मूल्य कमी झाले आहे. परिणामी 17 कोटी गुंतवणूक दारांचे साधारण 4.36 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

शेअर बाजार उघडताच व्यवहाराची सुरुवात लाल रंगाने झाली होती. अर्ध्या तासात बीएसई (सेन्सेक्स) 713.78 अंकांनी घसरून 71,950.69 अंकांपर्यंत आला. सध्या सेन्सेक्समध्ये 643.12 अंकांची घसरण झाल्याचे पाहायला मिळत असून हा निर्देशांक 72021.35 अंकांवर आहे. दुसरीकडे एनएसईमध्ये 181 अंकांची पडझड झाली असून 21,874.20 अंकावर पोहोचला आहे.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या ३० कंपन्यांपैकी २७ कंपन्यांतील शेअर्समध्ये घसरण झाली आहे. टाटाचे दोन शेअर्स कोसळले आहेत. टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये सर्वात मोठी घसरण झाली आहे. टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये जवळपास ७ टक्क्यांनी घसरण झाल्याची माहिती मिळत आहे.