Share Market: शेअर बाजारासाठी आज काळा दिवस, सेन्सेक्स 980 तर निफ्टीची ३२० ने घसरण
आज सकाळी ९.३० पासून सुरु झालेली घसरण ३० ला मार्केट बंद झालं तेव्हापर्यत मार्केटने अगदीचं निच्चांक गाठला असचं म्हणता येईल.
वर्षाच्या शेवटीचा आठवडा बाकी असताना या आठवड्यातला शेवटचा दिवस हा काळा शुक्रवार ठरला. आज सकाळी ९.३० पासून सुरु झालेली घसरण ३० ला मार्केट बंद झालं तेव्हापर्यत मार्केटने अगदीचं निच्चांक गाठला असचं म्हणता येईल. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 60 हजार अंकांखाली आला असून राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 18 हजार अंकांखाली घसरला. निफ्टी निर्देशांक 320 अंकांच्या घसरणीसह 17,806 तर सेन्सेक्स 980 अंकांच्या घसरणीसह 59,845 अंकांवर स्थिरावला. आज बाजारातील झालेल्या घसरणीमुळे गुंतवणुकदार अगदी मेटाकुटीला आले होते. या घसरणीमुळे गेल्या ७ दिवसांत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १९ लाख कोटी रुपयांची मोठी घट झाली आहे.
जागतिक स्तरावर मंदीची भीती, जगभरातील बँकांकडून व्याजदरात सातत्याने वाढ आणि जगातील विविद देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ यासह अनेक कारणांचा परिणाम शेअर बाजारावर पडल्याचं चित्र दिसुन आलं. तरी शेअर बाजार गडगडल्यामुळे गुंतवणुकदारांचं मोठं नुसकान झालं आहे. (हे ही वाचा:- Rules Change 1st January 2023: सर्वसामान्यांचं बजेट पुन्हा बिघडणार, 1 जानेवारी 2023 पासून बदलणार हे महत्वाचे नियम, जाणून घ्या, सविस्तर माहिती)
आज दिवसभरात केवळ टायटन, सिप्ला आणि डिविज् लॅबच्या शेअर दरात तेजी दिसुन आली. तर मेटल्स, एफएमसीजी, पीएसयू, आयटी सेक्टर, ऑटो सेक्टर आणि बॅकिंग सेक्टर अशा मोठ्या जायंट सेक्टमध्ये मोठी घसरण बघायला मिळाली. तरी पुढील आठवडा म्हणजेचं वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात बाजार पुन्हा गडगडणार की गगनाला भिडणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.