Rohini School Blast: दिल्ली पोलिसांनी टेलिग्रामला पत्र लिहून खलिस्तान समर्थक गटाची मागवली माहिती

खलिस्तान समर्थक फुटीरतावाद्यांना लक्ष्य करण्यासाठी भारतीय एजन्सींनी केलेल्या कारवाईचा बदला म्हणून हा स्फोट असल्याचा दावा सोशल मीडियावरील पोस्टमध्ये करण्यात आला आहे. रविवारी, 20 ऑक्टोबर रोजी झालेल्या या स्फोटात एका भिंतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

Rohini School Blast

Rohini School Blast: दिल्लीतील रोहिणी येथील प्रशांत विहार परिसरात सीआरपीएफ शाळेजवळ झालेल्या स्फोटानंतर दिल्ली पोलीस या घटनेतील खलिस्तानी संबंधाचा तपास करत आहेत. खलिस्तान समर्थक फुटीरतावाद्यांना लक्ष्य करण्यासाठी भारतीय एजन्सींनी केलेल्या कारवाईचा बदला म्हणून हा स्फोट असल्याचा दावा सोशल मीडियावरील पोस्टमध्ये करण्यात आला आहे. रविवारी, 20 ऑक्टोबर रोजी झालेल्या या स्फोटात एका भिंतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, परंतु या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. आता या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्यानंतर या स्फोटामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

रोहिणी स्फोटचे अपडेट:

दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया ॲप टेलिग्रामला पत्र लिहून 'जस्टिस लीग इंडिया' नावाच्या चॅनलची माहिती मागितली आहे.

स्फोटानंतर या चॅनलवर सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्यात आले, ज्यामध्ये स्फोटाची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती.

या संदर्भात टेलिग्रामकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

 

या स्फोटाचा तपास अद्याप सुरू असून अद्याप कोणत्याही संघटनेचे नाव समोर आलेले नाही. चॅनलवर स्फोटाची जबाबदारी स्वीकारण्यात आली असली तरी त्याची सत्यता तपासली जात आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कमी-तीव्रतेचे इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) होते, जे टायमर किंवा रिमोटद्वारे नियंत्रित होते. या आयईडीमध्ये कोणतेही श्रापनेल किंवा बॉल बेअरिंग नव्हते, जे स्पष्टपणे दर्शविते की, त्याचा उद्देश लोकांना इजा करण्याचा नव्हता, तर अधिकाऱ्यांना संदेश पाठवण्याचा होता. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, स्फोटाचे ठिकाण जाणूनबुजून निवडले होते जेणेकरून कोणालाही दुखापत होऊ नये.

घटनेनंतर एनआयए, एनएसजी, सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांच्या पथकांनी परिसराला वेढा घातला आणि फॉरेन्सिक तज्ञांनी नमुने गोळा केले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 7:35 ते 7:40 च्या दरम्यान स्फोट झाला आणि त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला होता.

संध्याकाळी, 'जस्टिस लीग इंडिया'च्या टेलिग्राम चॅनेलचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये स्फोटाची क्लिप 'खलिस्तान झिंदाबाद'च्या वॉटरमार्कही होता.

संध्याकाळी, 'जस्टिस लीग इंडिया'च्या टेलिग्राम चॅनेलचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये स्फोटाची क्लिप 'खलिस्तान झिंदाबाद'च्या वॉटरमार्कसह होती