PM Modi Oath Ceremony: शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मालदीवचे राष्ट्रपती, मॉरिशसचे पंतप्रधान दिल्लीत दाखल (Watch Video)
त्यामुळे देशातील नागरिकांचे याकडेच लक्ष लागून आहे.
PM Modi Oath Ceremony: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी आज पार पडणार आहे. त्यामुळे देशातील नागरिकांचे याकडेच लक्ष लागून आहे. शपथविधी सोहळ्यापूर्वी मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ रविवारी नवी दिल्ली येथे पोहोचले आहे. PM नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधना म्हणून शपथ घेणार आहे. शपथविधी सोहळ्यासाठी आज शेजारी देशाच्या नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. (हेही वाचा- जयंत चौधरी, अनुप्रिया पटेल, राजनाथ सिंह, पियुष गोयल, नितीन गडकरी आदी नेत्यांना मिळणार मोदी सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात स्थान; वाचा संभाव्य मंत्र्यांची यादी)
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत पोहोचल्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम ) पवन कपूर यांनी मालदीवचे राष्ट्रपतींचे स्वागत केले. दरम्यान OSD (ER & DPA) P. कुमारन यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांचे विमानतळावर स्वागत केले. पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी 7.15 वाजता राष्ट्रपती भवनात पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना शपथ देतील.
आज पंतप्रधान मोदींच्या शपथ विधी सोहळ्याला श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल, विक्रमसिंघे, मालदीवचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिक बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीमा, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल 'प्रचंड' यांचा समावेश आहे आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे. दरम्यान, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना शनिवारीच भारतात आले होते.