काँग्रेसचे 52 खासदार देशाचं संविधान वाचवण्यासाठी भाजपाला इंचा इंचाची टक्कर देणार: राहुल गांधी
काँग्रेस पक्षाच्या संसदीय नेतेपदाच्या निवडीसाठी शनिवारी सकाळी दिल्ली मध्ये बैठक घेण्यात आली होती ज्यामध्ये सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची पुन्हा एकदा या पदासाठी नेमणूक करण्यात आली. यानंतर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देखील सोनिया यांना शुभेच्छा दिल्या. यासोबत निवडून आलेल्या भाजपा सरकारवर निशाणा साधण्याची संधी हेरून काँग्रेसचे 52 खासदार देखील भाजपाला इंचाइंचाची टक्कर देतील असा विश्वास राहुल यांनी वर्तवला. आपला लढा हा देशातील संविधान व धर्मनिरपेक्षतेच्या बचावासाठी असल्याचे राहुल यांनी आपल्या भाषणात नमूद केले. दरम्यान सोनिया गांधी यांनी देखील नेतेपद स्वीकारल्यावर राहुल हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत असे म्हणत काँग्रेसला मत देणाऱ्या 12. 13 कोटी मतदारांचे आभार मानले.
राहुल गांधी ट्विट
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. एकेकाळी सर्वाधिक काळ सत्ता टिकवून ठेवणाऱ्या काँग्रेसला यंदा केवळ 52 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. इतकाच नव्हे तर अवघ्या दोन जागा कमी पडल्यामुळे काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदही गमावलं आहे. 'या अपयशानं खचून न जाता या देशातील गोरगरिबांसाठी, सामान्य नागरिकांसाठी काँग्रेसचा लढा सुरू आपल्याला सुरु ठेवायचा आहे . धर्म, लिंग, जातीभेद या साऱ्याच्या पलीकडे काँग्रेसची विचारधारा आहे. या विचारधारेला अनुसरून संविधानाच्या रक्षणासाठी सुरु केलेला लढा कायम ठेवा,' असं आवाहन राहुल यांनी खासदारांना केलं. तसेच काँग्रेसला यापुढे सोनिया गांधी यांचे नेतृत्व लाभणार असल्याने लोकसभेत काँग्रेस सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणार, असा दावा देखील राहुल यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाच्या संसदीय नेतेपदी सोनिया गांधी यांची नियुक्ती
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर राहुल यांनी भाजपा व मोदी यांचे अभिनंदन करत आपण नव्याने स्थापित झालेल्या सरकारच्या सोबतीने देशातील नागरिकांचे हिट जप[न्यासाठी काम करू असे आश्वासन राहुल यांनी एका ट्विट मार्फत दिले होते. पण या बैठकीत बोलताना पुन्हा एकदा राहुल यांचा भाजपा विरोधी नाराजीचा सूर ऐकायला मिळाला आहे.