MP Political Crisis: ज्योतिरादित्य सिंधिया यांचा मुलगा महाआर्यमान याचे ट्वीट - 'वडिलांच्या निर्णयाचा अभिमान'
त्यानंर त्यांच्या समर्थक आमदारांनीही ताबडतोब राजनामा देण्यास सुरुवात केली. काँग्रेसमध्ये राहून आपले लोक, कार्यकर्ते राज्यासाठी काम करु शकत नाहीत, असे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटले आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी काँग्रेस (Congress) पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यानंतर मध्य प्रदेशच्या राजकारणात मोठी उलथापलथ सुरु झाली. सिंधिया समर्थक आमदारांनीही राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. ही संख्या आतापर्यंत 22 इतकी झाल्याचे समजते. दरम्यान, ज्योतिरादित्य सिंधिया यांचे पूत्र महाआर्यमान सिंधिया (Mahanaryaman Scindia) यानेही ट्विट करुन आपल्या वडिलांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्यामुळे कमलनाथ सरकार अडचणीत आले आहे.
आपल्या ट्विटमध्ये महाआर्यमान सिंधिया याने म्हटल आहे की, 'वडिलांच्या भूमिकेचा मला अभिमान आहे. एक वारसा सोडण्यासाठी मोठी हिंमत लागते. इतिहास साक्षी आहे की, माझे कुटुंब कधीही सत्तेचे भुकेले नाही. वचन आहे की, मध्य प्रदेशमध्ये निर्णायक बदल येईल.'
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 10 मार्च 2020 या दिवशी काँग्रेस पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यानंर त्यांच्या समर्थक आमदारांनीही ताबडतोब राजनामा देण्यास सुरुवात केली. काँग्रेसमध्ये राहून आपले लोक, कार्यकर्ते राज्यासाठी काम करु शकत नाहीत, असे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, MP Political Crisis: ग्वाल्हेरच्या शिंदे कुटुंबाची राजकीय वाटचाल, राजमाता ते आजचे ज्योतिरादित्य सिंधिया)
महाआर्यमान ट्विट
दरम्यान, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्यानंर कमलनाथ सरकार मोठ्या अडचणीत सापडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजकीय भविष्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ज्योतिरादित्य हे येत्या काळात भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. दरम्यान, भाजप ज्योतिरादित्य सिंधिया यांना केंद्रात मोठी जबाबदारी देणार की, राज्यातच महत्त्वाचचे पद देणार याबाबत उत्सुकता आहे.