Manoj Jarange Patil: पुण्यातील शांतता रॅलीनंतर मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; सभेनंतर चक्कर आली, ब्लड प्रेशर कमी झाले

मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडल्यानंतर रात्री अचानक तब्येत खालवली.डॉक्टरांकडून त्यांना ३ ते ४ दिवसांचा विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

Manoj Jarange | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Manoj Jarange Patil: रात्री उशारी जरांगे पाटील यांना उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पुण्यात सभेदरम्यान त्यांना चक्कर आली होती. सध्या जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या ते अहील्यानगरकडे रवाना झाले आहे. पुण्यात शांतता रॅलीत भाषण केल्यानंतर अचानक प्रकृती बिघडली होती. सततचा प्रवास, उपोषण, व्यस्त वेळापत्रकामुळे मनोज जरांगे पाटील यांना अशक्तपणा जावणत होता. दरम्यान चक्कर आल्यामुळे त्यांना स्टेजवर बसावे लागले होते. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. मात्र,त्यासोबत त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. (हेही वाचा: Sharad Pawar on Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी शरद पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचा सल्ला)

मागील चार ते पाच दिवसांपासून जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्रात मराठा आरक्षण रॅलीत सहभागी झालेले आहेत. मनोज जरांगे यांची प्रकृती ठीक नसून हात थरथरत असल्याचं त्यांनी नमूद केले. भाषण संपल्यानंतर जरंगे पाटील यांना अचानक अशक्तपणा जाणवला आणि ते मंचावर ( Manoj Jarange Patil Health deteriorated) बसले. त्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण आणि सगेसोयऱ्याची आरक्षणाची अंमलबजावणी या मागण्यांसाठी मनोज जरांगे आक्रमक झाले आहे. शांतता रॅलीच्या माध्यमातून ते मराठी बांधवांना भेटी देत आहेत.

मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा नाशिकमध्ये समारोप होणार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील मध्यवर्ती सीबीएस चौकात जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. जरांगे पाटील यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात ठीकठिकाणी भगवे झेंडे आणि जरांगे पाटील यांचे बॅनर्स लावण्यात आले आहेत.



संबंधित बातम्या