मध्यप्रदेश: ऑपरेशन लोटसला धक्का; मुख्यमंत्री कमलनाथ यांनी घेतले 16 मंत्र्यांचे राजीनामे

या बैठकीत काय निर्णय होतो याबाबत उत्सुकता होती. ही उत्सुकता कायम असतानाच कमलनाथ यांनी मंत्र्यांचे राजीनामे घेतल्याचे वृत्त आले आहे. त्यामुळे आता मध्यप्रदेशचे राजकारण काय वळण घेेते आणि देशातील इतर राज्यांमध्ये असलेल्या आघाडी सरकारमध्ये त्याचा काय परिणाम होतो याबाबत उत्सुकता आहे.

File image of Kamal Nath with Jyotiraditya Scindia (Photo Credits: IANS)

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ ( Chief Minister Kamal Nath)  यांनी आपल्या मंत्रिमंडळीतील जवळपास 16 मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत. अर्थात मंत्र्यांचे हे राजीनामे मुख्यमंत्र्यांनी घेतले आहेत की मंत्र्यांनी स्वत:हून दिले आहेत याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, कमलनाथ यांनी भाजपच्या ऑपरेशन लोटसला धक्का देत विरोधकांची खेळी यशस्वी होऊ द्यायची नाही, असा चंग बांधल्याची चर्चा आहे.

मध्यप्रदेश राज्यात काँग्रेस प्रणीत मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये नाराजी असल्याची चर्चा काही दिवसांपासूनच सुरु होती. दरम्यान, कमलनाथ मंत्रिमंडळातील 6 मंत्र्यांसह सुमारे 17 आमदारांनी बंड केल्याचाही वृत्त लगोलग आले होते. हे सर्व आमदार दिल्ली येथून बंगळुरु येथे दाखल झाल्याचे प्रसारमाध्यामांनी दिलेल्या वृत्तात म्हटले होते.

दरम्यान, कमलनाथ सरकारमधील बंडखोर आमदार हे काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या गटातील असल्याचे मानले जाते. तसेच, या आमदारांच्या मदतीने भाजप येत्या अधिवेशनात कमलनात सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करणार अशी चर्चा होती. ही चर्चा सुरु असतानाच कमलनाथ यांनी विरोधी पक्षातील आणि स्वपक्षातील विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे. (हेही वाचा, मध्य प्रदेश: मुख्यमंत्री कमलनाथ सरकारला धोका? ज्योतिरादित्य सिंधिया समर्थक 17 काँग्रेस आमदारांचे बंड; BJP अविश्वास प्रस्तावाच्या तयारीत)

एएनआय ट्विट

मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आज सायंकाळी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत काय निर्णय होतो याबाबत उत्सुकता होती. ही उत्सुकता कायम असतानाच कमलनाथ यांनी मंत्र्यांचे राजीनामे घेतल्याचे वृत्त आले आहे. त्यामुळे आता मध्यप्रदेशचे राजकारण काय वळण घेेते आणि देशातील इतर राज्यांमध्ये असलेल्या आघाडी सरकारमध्ये त्याचा काय परिणाम होतो याबाबत उत्सुकता आहे.