पश्चिम बंगाल: अमित शाह यांच्या रोड शो मध्ये हिंसाचार; परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज
लोकसभा निवडणूक 2019 च्या प्रचारासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह (Amit Shah) यांचा पश्चिम बंगाल मधील कोलकता येथे रोड शो सुरु होता.
लोकसभा निवडणूक 2019 च्या (Loksabha Elections 2019) प्रचारासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह (Amit Shah) यांचा पश्चिम बंगाल मधील कोलकता येथे रोड शो सुरु होता. मात्र कॉलेज स्ट्रीट मार्गावर कोलकात्ता विद्यापीठाजवळून जाताना अमित शहांवर काठ्या भिरकावण्यात आल्या. दगडफेकही करण्यात आली. शहा-मोदींचे पोस्टर्सही फाडण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
या सर्व हिंसाचारानंतर भाजप कार्यकर्त्यांनी हॉस्टेलच्या इमारतीबाहेर जाळपोळ केली. भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्त्ये आपाआपसात भिडले. या घटनेचे व्हिडिओज, फोटोज समोर आले आहेत.
ANI ट्विट:
या सर्व प्रकारानंतर अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांचे काही रोड शो रद्द करण्यात आले आहेत. 19 मे रोजी पश्चिम बंगाल मधील 9 जागांसाठी मतदान होणार आहे.