National Handloom Day 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून दिल्या राष्ट्रीय हातमाग दिनाच्या शुभेच्छा, सोबतच #Vocal4Handmade चा केला प्रचार
त्यांनी आमच्या देशातील स्वदेशी कलाकुसर जपण्यासाठी स्तुत्य प्रयत्न केले आहेत." असे ट्विट करत शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर #Vocal4Handmade चा प्रचार देखील केला.
7 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात राष्ट्रीय हातमाग दिवस (National Handloom Day) म्हणून साजरा केला जातो. विविधतेने नटलेल्या भारत देशात पारंपारिक वस्त्र आणि वस्त्रकला हे देखील खूप महत्वाचा भाग समजला जातो. या वस्त्रकलेचा आदर करण्याचा आणि हातमाग आणि हस्तकला जतन करण्यासाठी आज संपूर्ण देशात 'राष्ट्रीय हातमाग दिवस' साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील हातमाग आणि हस्तकला अवगत असलेल्या देशातील तमाम कारागिरांना राष्ट्रीय हातमाग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
आजच्या या खास दिनादिवशी पंतप्रधान मोदींनी "आमच्या हातमाग आणि हस्तकला क्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्वांना सलाम करतो. त्यांनी आमच्या देशातील स्वदेशी कलाकुसर जपण्यासाठी स्तुत्य प्रयत्न केले आहेत." असे ट्विट करत शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर #Vocal4Handmade चा प्रचार देखील केला. हेदेखील वाचा-
हा पारंपारिक कलेला आपण सर्वांनी मिळून प्रोत्साहन दिले पाहिजे आणि आत्मनिर्भर भारत बनविण्याचे दिशेने प्रयत्न केला पाहिजे, असेही मोदी म्हणाले.
आपल्या पारंपरिक वस्त्र आणि वस्त्रकला यांचा अभिमान बाळगला पाहिजे, त्यांचे जतन केले पाहिजे.त्यांच्यावर प्रेम करणे, ती पारंपरिक वस्त्रे वापरणे, त्यांचा आनंद घेणे, म्हणजेच त्यांचं आपल्या जीवनात असलेलं अस्तित्व असणं हे मुख्य उद्दिष्ट्य हा दिन साजरा करण्यामागे आहे.