Pilgrimage to Amarnaath: अमरनाथ यात्रेसाठी जम्मू बेस कॅम्पमधून ४,६०० हून अधिक यात्रेकरू रवाना

अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. येथील भगवती नगर बेस कॅम्पमधून काश्मीरमधील बालटाल आणि पहलगाम बेस कॅम्पसाठी रवाना झालेल्या यात्रेकरूंची ही १३ वी तुकडी आहे.

Amarnaath

Pilgrimage to Amarnaath:  मुसळधार पावसात, अमरनाथ यात्रेत सामील होण्यासाठी बुधवारी पहाटे 4,600 हून अधिक यात्रेकरूंची  तुकडी जम्मूहून काश्मीरमधील दोन बेस कॅम्पसाठी रवाना झाली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. येथील भगवती नगर बेस कॅम्पमधून काश्मीरमधील बालटाल आणि पहलगाम बेस कॅम्पसाठी रवाना झालेल्या यात्रेकरूंची ही १३ वी तुकडी आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 4,627 यात्रेकरूंचा समूह पहाटे 3 वाजता 185 वाहनांमधून "बम बम भोले" च्या घोषणा देत निघाला आणि त्यांना सीआरपीएफच्या तुकडीने सुरक्षा पुरवली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 95 वाहनांमधील 2,773 यात्रेकरूंनी यात्रेसाठी 48 किमी लांबीचा पारंपारिक पहलगाम मार्ग निवडला आहे, तर 90 वाहनांमधील 1,854 यात्रेकरू तुलनेने लहान (14 किमी) परंतु कठीण बालटाल मार्गाने गुहा मंदिराकडे जातील.

जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी 28 जून रोजी अमरनाथ यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला होता. तेव्हापासून जम्मू बेस कॅम्पवरून एकूण 72,325 यात्रेकरू घाटीकडे रवाना झाले आहेत. 52 दिवसांचा हा प्रवास औपचारिकपणे 29 जून रोजी काश्मीरमधील दोन बेस कॅम्पपासून सुरू झाला आणि 19 ऑगस्ट रोजी संपेल. गेल्या वर्षी साडेचार लाखांहून अधिक भाविकांनी बाबा बर्फानीचे दर्शन घेतले होते.