Lumpy Skin Disease: 'लम्पी'च्या प्रादुर्भावाने देशभरात आतापर्यंत 57 हजारांहून अधिक जनावरांचा बळी; या आजारावर काय आहे तज्ज्ञांचे मत, जाणून घ्या

Lumpy Skin Disease: 'लम्पी'च्या प्रादुर्भावाने देशभरात आतापर्यंत 57 हजारांहून अधिक जनावरांचा बळी; या आजारावर काय आहे तज्ज्ञांचे मत, जाणून घ्या
Lumpy Skin Disease (PC - ANI)

Lumpy Skin Disease: पशुपालन हे देशातील एका मोठ्या वर्गाचे उत्पन्नाचे साधन आहे. मात्र, त्यावर लम्पी (Lumpy) नावाच्या संसर्गजन्य रोगाने ग्रहण लावले आहे. राजस्थान आणि आसपासच्या भागात धुमाकूळ घालणाऱ्या या आजाराने आता देशाची राजधानी दिल्लीतही थैमान घातले आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, दिल्लीत या आजाराचे 173 रुग्ण आढळले आहेत. मात्र, आतापर्यंत एकाही प्राण्याच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. देशातील उर्वरित राज्यांची परिस्थिती काय आहे, हा आजार कसा रोखता येईल, या आजारावर तज्ञाचे मत काय आहे? जाणून घेऊयात...

दिल्ली सरकारने 8287848586 हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला असून संसर्ग रोखण्यासाठी विलगीकरण वॉर्ड तयार केला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, गुरांना लस देण्यासाठी दिल्ली सरकार गोट पॉक्स लसीचे 60 हजार डोस खरेदी करणार आहे. दिल्लीतील पशुपालकांना या लसी मोफत दिल्या जाणार आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्ली सरकार लसीकरण धोरण वापरेल ज्या अंतर्गत पाच किलोमीटरच्या परिघात निरोगी गुरांना गाय पॉक्सची लस दिली जाईल. (हेही वाचा - Bengaluru Flood: ऑफिसमध्ये पाणी शिरल्यावर चक्क कॉफी शॉपमध्ये डेस्कटॉप घेऊन पोहोचले कर्मचारी; फोटो व्हायरल (See))

लम्पी रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने राज्यांना गुरांची लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्यास सांगितले आहे. सहा-सात राज्यांमध्ये त्याचा अधिक प्रभाव आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार हा आजार गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात पसरला आहे.

लम्पीमुळे 57 हजारांहून अधिक गुरांचा मृत्यू -

या आजारामुळे देशभरात 57 हजारांहून अधिक गुरांचा मृत्यू झाला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, राजस्थान आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात गुरांच्या मृत्यूमागे त्यांचे खराब आरोग्य हे एक कारण असू शकते. मध्य प्रदेशातील 10 जिल्ह्यांमध्ये 2,100 हून अधिक गुरांना या आजाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे. मध्य प्रदेश सरकारने राज्याच्या बाधित भागात गोवंश जनावरांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे.

राजस्थानचा लम्पीचे सर्वाधिक बळी -

केंद्र सरकारने केंद्रीय स्तरावर एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे, ज्यातून राज्यांना सर्व शक्य सल्ला आणि मदत दिली जात आहे. राजस्थानला या आजाराचा सर्वाधिक फटका बसल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसून येते. राजस्थानमध्ये या आजारामुळे सर्वाधिक 37 हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारकडून या आजाराबाबत राज्यांना सातत्याने सूचना पाठवण्यात येत आहेत.

लम्पी रोगाची लक्षण काय आहेत?

हिमाचल प्रदेश सरकारने लंप्मी रोगाला महामारी म्हणून घोषित करण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. या आजाराच्या लक्षणांमध्ये जास्त ताप, दुधाचे उत्पादन कमी होणे, त्वचेवर गुठळ्या येणे, भूक न लागणे, नाकातून पाणी येणे आणि डोळ्यांत अश्रू येणे यांचा समावेश होतो.

लम्पीपासून जनावरांचे 'अशा' प्रकारे करा संरक्षण -

तज्ञांच्या मते, हा रोग टाळण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे संक्रमित प्राण्याला वेगळे करणे. तबल्याची म्हणजेच गोठ्याची स्वच्छता ठेवा. डास दूर करण्यासाठी फवारणी आणि धूर. संसर्ग टाळण्यासाठी, जनावरांना गाउट पॉक्स विरूद्ध लसीकरण करावे. आजारी जनावरांना डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे द्यावीत. तज्ज्ञांच्या मते, आजपर्यंत लम्पी विषाणूचा अँटीडोज तयार झालेला नाही. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. सध्या वेगाने पसरणाऱ्या या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी गोटपॉक्सची लस लावण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. गोटपॉक्स लस या रोगाशी लढण्यासाठी खूप प्रभावी सिद्ध झाली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 11, 2022 06:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).