Uttarakhand Shocker: नववर्षानिमित्त मद्यधुंद अवस्थेत 3 डॉक्टरांचा रस्त्याच्या मधोमध धिंगाणा, व्यवस्थापनाने केले निलंबित
तेथे मात्र तीन जण नशेच्या अवस्थेत दिसले.
उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशी (Uttarkashi) जिल्ह्यात मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याने तीन डॉक्टरांना निलंबित (Doctor suspended) करण्यात आले आहे. हे तिन्ही डॉक्टर दारूच्या नशेत मस्ती करत होते आणि नाचत होते. ते उत्तरकाशीच्या बिरुंखल (Bhirunkhal) येथील शुभम सर्वम मेडिकल प्रोजेक्ट कंपनीने पीपीपी मोडवर चालवल्या जाणाऱ्या सामुदायिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर होते. डॉक्टर मद्यधुंद अवस्थेत आढळल्यानंतर स्थानिक लोकांनी रुग्णालय व्यवस्थापनाला माहिती दिली. यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाने तिघांनाही निलंबित केले आहे. या घटनेबाबत स्थानिक तरुणांनी सांगितले की, शनिवारी बिरुंखल मंदिरात भंडारा सुरू होता. तेथे मात्र तीन जण नशेच्या अवस्थेत दिसले.
मंदिराजवळ तिघेही मस्ती करत होते आणि नाचत होते. त्याचवेळी ते जोरजोरात ओरडत होते. याला स्थानिकांनी विरोध केला. यानंतर ते सामुदायिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर असल्याची माहिती मिळाली. रुग्णालयातील डॉक्टरांना मद्यधुंद अवस्थेत पाहून लोक संतप्त झाले आणि त्यांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापकाकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर या तीन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले. हेही वाचा Sexual Harassment Case: लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हरियाणाचे क्रीडा मंत्री Minister Sandeep Singh यांचा राजीनामा; म्हणाले- 'माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न'
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॉस्पिटलचे व्यवस्थापन सांभाळणारे शैलब चौबे यांनी ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचे म्हटले आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी डॉक्टरांना निलंबित करण्यासोबतच उच्चस्तरीय विभागीय चौकशी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नवीन वर्षाच्या जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील पोलीस यंत्रणा सतर्क आहे. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उत्तराखंडमध्ये येतात.
येथील डॉक्टर नशेच्या अवस्थेत असे कृत्य करताना आढळतात, तेव्हा चिंतेचा विषय होतो. हे पाहता रुग्णालयाच्या व्यवस्थापकाने तातडीने कारवाई करत डॉक्टरांना निलंबित केले. दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी शहरात नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी 156 जणांना आणि हेल्मेट न घालता मोटारसायकल चालवल्याबद्दल 2,465 जणांना अटक केली. हेही वाचा Navi-Mumbai Metro Project: नवी-मुंबई मेट्रो प्रकल्पातील सेंट्रल पार्क आणि बेलापूर स्थानकांदरम्यान मेट्रोची ट्रायल रन यशस्वी
एका अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. नववर्षाच्या उत्सवादरम्यान नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पकडण्यासाठी शनिवारी रात्री उशिरा ते रविवारी पहाटे मोहीम राबविण्यात आली.