Youngest Victim of Cardiac Arrest in MP: मध्य प्रदेशात अवघ्या 12 वर्षीय मुलाचा कर्डिएक अरेस्टने मृत्यू
मध्य प्रदेशात कार्डिएक अरेस्टने मृत पावलेल्या मुलाचं नाव मनिष जातव आहे. तो चौथीमध्ये शिकत होता. मध्य प्रदेशात कार्डिएक अरेस्टने मृत पावलेला हा सर्वात लहान मुलगा आहे.
मागील काही महिन्यात ऐन तारूण्यातील मुलं-मुली हृद्यविकाराच्या झटक्याने जागच्या जागीच मृत पावल्याच्या अनेक घटना निदर्शनास आल्या आहेत. मध्य प्रदेशात नुकत्याच एका 12 वर्षीय मुलाचा हृद्यविकाराच्या झटक्याने निधन ( Sudden Cardiac Attack) झाल्याची सुन्न करणारी घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील भिंड (Bhind) प्रांतामध्ये एक 12 वर्षीय मुलगा स्कूल बस मध्ये कोसळल्याची घटना समोर आली आहे.
मध्य प्रदेशात कार्डिएक अरेस्टने मृत पावलेल्या मुलाचं नाव मनिष जातव आहे. तो चौथीमध्ये शिकत होता. मध्य प्रदेशात कार्डिएक अरेस्टने मृत पावलेला हा सर्वात लहान मुलगा आहे. दरम्यान आज ही घटना समोर आली आहे. Etawah Road वरील ही शाळा आहे. दुपारी 2 च्या सुमारास तो बस मध्ये चढला आणि जागीच कोसळला. दरम्यान त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल केले पण डॉक्टरांनी त्याला जागीच मृत घोषित केले आहे. Healthy Heart Tips: जीम मध्ये वर्कआऊट करताना फीटनेस फ्रीक लोकांनी टाळल्या पाहिजेत 'या' चूका; अन्यथा हार्ट अटॅक चा धोका!
बसच्या ड्रायव्हरने तातडीने शाळेला देखील कळवले. त्यानंतर त्यांनी मुलाला जवळच्या हॉस्पिटल मध्ये नेले. district hospital surgeon Dr Anil Goyal यांनी PTI ला दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या लक्षणांवरून त्याचा मृत्यू कार्डिएक अरेस्टने झाला असावा असं वाटत होतं. त्याला सीपीआर देऊन वाचवण्याचा देखील प्रयत्न केला पण सारे प्रयत्न अयशस्वी ठरले.
दरम्यान मुलाच्या पालकांनी पोस्ट मार्टम करण्यास नकार दिल्याचं म्हटलं आहे. डॉ. गोयल यांनी असे अचानक मृत्यूचे प्रकार कोविड 19 नंतर वाढले आहेत. कदाचित इतक्या कमी वयाच्या व्यक्तीचा मृत्यू कार्डीएक अरेस्टने व्हावा अशी ही कदाचित मध्य प्रदेशातील पहिलीच घटना असावी असा कयासही त्यांनी बांधला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)