Couple Paraded in Andhra Pradesh: पतीचे विवाहबाह्य संबध असल्याचे आरोप करत पत्नी आणि सासरच्या लोकांनी व्यक्ती आणि महिलेची अर्धमुंडण करत काढली धिंड
स्थानिकांनी नाझिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, त्यांच्यावर बेकायदेशीर अतिक्रमण, बंदिवास, चुकीच्या पद्धतीने प्रतिबंध, विनयभंग आणि इतर गुन्ह्यांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
आंध्र प्रदेशातील श्री सत्यसाई जिल्ह्यातील लेपाक्षी गावात सोमवारी एका महिलेला आणि तिच्या प्रियकराला त्यांच्या कथित विवाहबाह्य संबंधांमुळे पुरुषाची पत्नी आणि सासरच्या लोकांनी अर्धवट मुंडन करत मारहाण करुन त्यांची धिंड काढली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हुसेन (30) याच्या शबाना (32) सोबतच्या कथित प्रेमसंबंधामुळे संतप्त झालेल्या नाझिया आणि तिच्या कुटुंबीयांनी त्यांचे हात बांधले आणि दुपारी गावातील रस्त्यावर त्यांची परेड केली. "हुसेनचे शबानासोबत कथित अवैध संबंध आहेत आणि याच कारणामुळे हुसेनची पत्नी शबाना राहत असलेल्या ठिकाणी गेली आणि दोघांनाही मारहाण करत धिंड काढली," असे हिंदुपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी पी कंजक्षण यांनी पीटीआयला सांगितले. (हेही वाचा - Sambhaji Bhide: संभाजी भिंडे यांच्या विरोधारात पुण्यात गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण?)
पाहा ट्विट -
त्यांच्यावर करण्यात आलेल्या अत्याचाराचे चित्रीकरण करण्यात आले आणि नाझियाच्या कुटुंबीयांनी हा व्हिडिओ व्हायरल केला, ज्यात शबानाला लाथ मारल्याचाही समावेश आहे. नंतर, या दोघांना एका ऑटो-रिक्षातून परीगी मंडलमधील हुसैनच्या मूळ गावी उतुकुरू येथे नेण्यात आले जेथे स्थानिकांनी नाझिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, असे कंजाक्षन यांनी सांगितले.
त्यांच्यावर बेकायदेशीर अतिक्रमण, बंदिवास, चुकीच्या पद्धतीने प्रतिबंध, विनयभंग आणि इतर गुन्ह्यांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर एफआयआर हिंदूपूर 1 टाऊन पोलिस स्टेशनच्या अधिकारक्षेत्रात हस्तांतरित केला जाईल, असे ते म्हणाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबाना दोन वर्षांपूर्वी पतीपासून विभक्त झाली होती.