Weather Update Tomorrow: दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह देशातील अनेक भागात विक्रमी उष्णता आहे. राजस्थानच्या चुरूमध्ये तापमान 50.5 अंश, दिल्लीच्या मुंगेशपूर आणि नरेलामध्ये 49.9 अंश आणि हरियाणाच्या सिरसामध्ये 49.5 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलासा देणारी बातमी दिली आहे. IMD नुसार देशातील सर्व राज्यांमध्ये 30 मे पासून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात होईल. उद्याच्या हवामानाबाबत हवामान खात्याने सांगितले की, अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत वायव्येकडून पूर्वेकडे वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे उत्तर भारतातील सर्व भागात कमाल तापमानात घट होईल.
अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे १ ते २ जून दरम्यान पाऊस अपेक्षित आहे. ३१ मेपर्यंत तापमानात ४ ते ५ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थानच्या लोकांनाही ३० मेपासून उष्णतेपासून दिलासा मिळू लागेल. 30 मे पासून अरबी समुद्रातून वाहणाऱ्या वाऱ्याच्या प्रभावामुळे येत्या दोन-तीन दिवसांत दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्ये पाऊस पडेल. त्यामुळे पुढील काही दिवस तापमानातील चढउतार कायम राहू शकतात.