Wayanad by-election Result: वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी यांचा मोठा विजय

वायनाड लोकसभा मतदारसंघात (Wayanad Lok Sabha Constituency) झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi) यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. त्यांनी या ठिकाणी जवळपास चार लाखांहून अधिक मते मिळाला आहे.

Priyanka Gandhi (Photo Credit: Twitter/ANI)

वायनाड लोकसभा मतदारसंघात (Wayanad Lok Sabha Constituency) झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा () यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. त्यांनी या ठिकाणी जवळपास चार लाखांहून अधिक मते मिळाला आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये या मतदारसंघातून राहुल गांधी यांनी उमेदवारी केली होती. त्यामुळे ज्यात ते निवडून देखील आले होते. मात्र, उत्तर प्रदेशातील रायबरेलीची जागा कायम राखण्यासाठी वायनाड मतदारसंघातून राजीनामा दिल्यानंतर ही पोटनिवडणूक झाली. राहुल गांधींच्या निर्णयामुळे वायनाडची जनता नाराज होऊ शकते अशी चर्चा होती. मात्र, प्रचारादरम्यान प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रचार करत निवडणूक जिंकली.

वायनाडच्या जनतेची नाराजी दूर

लोकसभा निवडणूक 2019 आणि 2024 मध्ये वायनाड लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी यांना जनतेने निवडून दिले होते. मात्र, अल्पावधीतच त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे स्थानिक मतदारांमध्ये सुरुवातीला नाराजी पाहायला मिळत होती. मात्र, ही नाराजी दूर करत प्रियंका गांधी यांनी मोठ्या प्रमाणावर विजय मिळवला. या मतदारसंघात आलेल्या नैसर्गिक आपत्तीवेळीही प्रियंकायांनी घटास्थळाला भेट दिली होती. भूस्खलनादरम्यान प्रियंकांनी दिलेली भेट स्थानिक जनतेच्या हृदयास साद घालून गेली. (हेही वाचा, Wayanad Bypoll Results: लोकसभा पोटनिवडणुकीत वायनाड येथून Priyanka Gandhi Vadra आघाडीवर)

भाजप आणि भाकपचा पराभव

दरम्यान, वायनाड लोकसभा पोटनिवडणुक निकालाने भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांना धक्का दिला आहे. सीपीआयचे उमेदवार सत्यन मोखेरी आणि भाजप उमेदवार नव्या हरिदास हे एप्रिल 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना मिळालेल्या मतांशी बरोबरी करण्यात या वेळी अपयशी ठरले. निवडणुकीत मोखेडी आणि हरिदास यांना अनुक्रमे 2.09 लाख आणि 1.09 लाख मते मिळाली. याउलट, प्रियंका गांधींच्या प्रभावी विजयाच्या फरकाने काँग्रेस पक्षातील एक उदयोन्मुख स्टार म्हणून त्यांचे स्थान मजबूत केले आहे.

निकालानंतर बोलताना, वायनाडमधील प्रियंका गांधींचे निवडणूक व्यवस्थापक असलेले आमदार टी. सिद्दीकी म्हणाले की, प्रियंका गांधी यांनी त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांना फोन केला होता. "आभार मानण्यासाठी त्या लवकरच वायनाडला येतील आणि आता त्या संसदेच्या वरीष्ठ सभागृहात असतील. या मतदारसंघातील जनतेचा आवाज ठरण्यासाठी त्या प्रयत्न करतील, असेही सिद्दीकी म्हणाले. निवडणुकीतील पराभवांच्या मालिकेनंतर देशात आपले अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी काम करत असलेल्या काँग्रेस पक्षासाठी प्रियंका गांधींच्या विजयाकडे लक्षणीय यश म्हणून पाहिले जात आहे. पक्ष आता 2029 च्या लोकसभा निवडणुकीत आपले स्थान मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रियंका गांधी यांच्या प्रसिद्धी आणि करिश्म्याचा नक्की प्रयत्न करेन असे दिसते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now