Viral Video: रील बनवताना 6 वर्षीय तरुणीचा तोल गेल्यामुळे 6 व्या मजल्यावरून पडली खाली, गाझियाबादमधील घटना

तरुण, महिला, मुला-मुलींमध्ये रिलची क्रेझ वाढत आहे. त्यामुळे या लोकांचा जीवही धोक्यात आला आहे. गाझियाबादच्या इंदिरापुरममध्ये आता एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे एक मुलगी रील बनवताना सहाव्या मजल्यावरून खाली पडली. मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाझियाबादच्या इंदिरापुरम येथील क्लाउड सोसायटीमध्ये ही घटना घडली.

Viral Video

Viral Video: तरुण, महिला, मुला-मुलींमध्ये रिलची क्रेझ वाढत आहे. त्यामुळे या लोकांचा जीवही धोक्यात आला आहे. गाझियाबादच्या इंदिरापुरममध्ये आता एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे एक मुलगी रील बनवताना सहाव्या मजल्यावरून खाली पडली. मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाझियाबादच्या इंदिरापुरम येथील क्लाउड सोसायटीमध्ये ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पाऊस पडत होता आणि या इमारतीत राहणारी मोनिषा ही 16 वर्षांची मुलगी तिच्या फ्लॅटच्या बाल्कनीत उभी राहून रील बनवत होती. रील बनवत असताना तिच्या हातातून मोबाईल निसटला आणि मोबाईल पकडण्याच्या प्रयत्नात ती बाल्कनीतून खाली पडली. या घटनेनंतर मुलगी खाली पडली असून ती गंभीर जखमी झाल्याचे दिसून येते. मुलगी खाली पडताच इमारतीत एकच गोंधळ उडाला. हे देखील वाचा: Stunt Viral Video: चालत्या ट्रकच्या मागे जीव डोक्यात घालून स्केटिंग करत होते दोन तरुण, व्हिडीओ व्हायरल

व्हिडिओ पाहा:

जखमी अवस्थेतही मुलगी रुग्णवाहिका बोलवण्याबाबत बोलत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. आजूबाजूला बरेच लोक आहेत, पण लगेच कोणी उचलत नाही, मग दोन लोक येऊन मुलीला उचलतात. घटनेनंतर मुलीचे कुटुंबीयही खाली येतात. आणि तिला रुग्णालयात घेऊन जाण्यात येते.  मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. @Amanyadav7629 या हँडलवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आह

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now