Child Sex Abuse प्रकरणी युट्युबर Kuwari Begum विरोधात गुन्हा दाखल
'कुंवारी बेगम' (YouTuber Kuwari Begum) नावाने सोशल मीडियावर वावरणाऱ्या एका महिलेवर उत्तर प्रदेश पोलिसांनी कारवाई करत तिला ताब्यात घेतले आहे. सदर महिला युट्युबर असून, तिने आपल्या युट्युब व्हिडिओच्या माध्यमातून आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शिखा मेत्रे (YouTuber Shikha Metray) असे या युट्युबरचे नाव आहे.
'कुंवारी बेगम' (YouTuber Kuwari Begum) नावाने सोशल मीडियावर वावरणाऱ्या एका महिलेवर उत्तर प्रदेश पोलिसांनी कारवाई करत तिला ताब्यात घेतले आहे. सदर महिला युट्युबर असून, तिने आपल्या युट्युब व्हिडिओच्या माध्यमातून आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शिखा मेत्रे (YouTuber Shikha Metray) असे या युट्युबरचे नाव आहे. तिने आपल्या युट्युब चॅनलवरुन प्रसारीत केलेल्या सामग्रीमध्ये 'लहान बाळांचे लैंगिक शोषण कसे करावे' (Child Abuse) याबाबत मार्गदर्शन केल्याचे समजते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या महिलेला तातडीने अटक करुन तिच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली जात होती. गाझियाबाद (Ghaziabad पोलिसांनी घटनेची दखल घेऊन तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
न्याय फाउंडेशनकडून आक्षेप
गाझियाबाद शहरातील सरिवासी असलेल्या 'कुंवारी बेगम' नावाने प्रसिद्ध असलेल्या महिलेने युट्यूबवरील लाइव्ह-स्ट्रीमिंग व्हिडिओमध्ये तिच्या अनुयायांना (बहुतेक तरुणांना) "बाळांचे लैंगिक शोषण कसे करावे" हे कथीतरित्या शिकवले. दरम्यान सदर महिलेनेची सामग्री युट्युबवर प्रसिद्ध होताच एकम न्याय फाउंडेशनचे संस्थापक दीपिका नारायण भारद्वाज यांनी त्यावर गंभीर आक्षेप घेतला. तसेच, हा व्हायरल व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास आणत सदर महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, दीपिका नारायण भारद्वाज यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे 12 जून रोजी एफआयआर दाखल केल्यानंतर तपास सुरू झाला.
युट्युबरवर बालअत्याचाराला समर्थन दिल्याचा आरोप
दीपिका नारायण भारद्वाज यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिने आपल्या युट्युब चॅनलवर 'ती नाही म्हणेल, तिला म्हणू द्या' नावाने एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून युट्युबरने महिला अत्याचारास प्रोत्साहन दिले आहे. महिलांच्या संमतीकडे पुरुषांनी दुर्लक्ष करायला हवे असा आशयाची विधाने केली आहेत. दुसऱ्या बाजूला मुलांबद्दलच्या लैंगिक वर्तनालाही त्यांनी प्रोत्साहन दिले असल्याचा दावा केला आहे. महिलेने युट्युबवर अपलोड केलेली सामग्री दिशाभूल करते आणि त्यांना कथीतरित्या अयोग्य वर्तनाकडे नेते, असादावाही भारद्वाज यांनी केला आहे. (हे ही वाचा, Beed Brawl Video: महिला बस कंडक्टर आणि महिला प्रवासी यांच्यात जोरदार राडा, घटनेचा व्हिडिओ व्हायरल)
एक्स पोस्ट
भारद्वाज यांनी सदर महिलेचे चॅनेल शोधून काढले आणि मेट्रेच्या व्हिडिओंवरील क्लिप X वर पोस्ट केल्या, सामग्री काढून टाकण्याची आणि मुलांविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वयंघोषित गेमरविरुद्ध कारवाईची मागणी केली. कुवारी बेगमच्या विरोधात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडिया वापरकरत्यांना आढळले की, मेट्रे ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) दिल्लीची पदवीधर आहे आणि परिधान व्यवसायात गुंतलेली आहे. दरम्यान, पोलिसांनी तिची सोशल मीडिया खाती निष्क्रीय केल्याचे समजते. तिच्यावर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)