केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहमदाबाद येथील केडी हॉस्पीटलमध्ये दाखल, शस्त्रक्रियेपूर्वी तपासणी होण्याची शक्यता

मात्र, टीव्ही नाईन मराठीने दिलेल्या वृत्तात अमित शाह यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यापूर्वी त्यांच्यावर काही तपासण्या करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

Union Home Minister Amit Shah | (Photo Credit: amitshah)

केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह (Union Home Minister Amit Shah ) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. अमित शाह यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यासठी तपासणी करुन घेण्यासाठी ते अहमदाबाद (Ahmedabad ) येथील केडी हॉस्पिटलमध्ये ( KD Hospital  In Ahmedabad )  दाखल झाले असल्याचे समजते.

दरम्यान, अमित शाह यांच्यावर नेमकी कोणत्या प्रकारची शस्त्रक्रिया होणार आहे याबाबत विस्तृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, टीव्ही नाईन मराठीने दिलेल्या वृत्तात अमित शाह यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यापूर्वी त्यांच्यावर काही तपासण्या करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. अमित शाह हे गेल्या काही काळापासून मानदुखीने त्रस्त आहेत. त्यावरच उपचार करण्यासाठी ते रुग्णालयात दाखल झाले असल्याचे समजते.  (हेही वाचा, Ganesh chaturthi 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा)

ट्विट

ताजे ट्विट

भारतीय जनता पक्षात अमित शाह यांजा मोठा दबदबा आहे. गेली अनेक वर्षे सत्तेपासून दूर असलेल्या भाजपला सत्ता मिळवून देणारा किंगमेकर अशी त्यांची प्रतिमा लोकसभा निवडणूक 2014 नंतर बनली आहे. लोकसभा 2014 वेळीही अमित शाह हे भाजप पक्षाध्यक्ष होते. लोकसभा निवडणूक 2019 वेळीही भाजपचे अध्यक्षपद अमित शाह यांच्याकडेच होते. दरम्यान, दोन्ही वेळी भाजपला विजय मिळाला आहे. दरम्यान, एक व्यक्ती एक पद अशी पद्धत भाजपमध्ये आहे. त्यामुळे आता केंद्रीय मंत्रिपद स्वीकारल्यानंतर अमित शाह यांच्याकडेच अध्यक्षपद राहणार की, भाजप अध्यक्ष बदलणार याबाबत उत्सुकता आहे.