Uddhav Thackeray Ayodhya Visit: उद्धव ठाकरे यांचा लेक आदित्य ठाकरे यांना शाब्दिक चिमटा, 'जेव्हा सगळं न मागताच मिळतं तेव्हा'.. पहा पत्रकाराच्या प्रश्नाला दिलेले 'हे' उत्तर

तो असा, की एका पत्रकाराने आदित्य यांना आज राम लल्लांकडे काय मागणार असा प्रश्न केला होता, यावेळी उद्धव यांनी 'जेव्हा सगळं न मागताच मिळतं तेव्हा काही मागायची गरज काय? असा प्रतिप्रश्न करत उत्तर दिले

Aditya Thackeray, Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook, PTI)

शिवसेना (Shivsena)  कार्यकर्ते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  यांच्या सोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) अयोध्या दौऱ्यासाठी (Ayodhya Visit)  गेले आहेत, रामलल्लांचे दर्शन घेण्यापूर्वी त्यांनी अयोध्येत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, राममंदिर उभारणी देणगी देण्यापासून ते पूर्वीचा मित्रपक्ष भाजपाला टोलवण्यापर्यंत अनेक विधाने मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र यावेळी विशेष म्हणजे उद्धव यांनी आपला लेक आदित्य ठाकरे यांना सुद्धा हळूच शाब्दिक चिमटा घेतला आहे. तो असा, की एका पत्रकाराने आदित्य यांना आज राम लल्लांकडे काय मागणार असा प्रश्न केला होता, यावेळी उद्धव यांनी 'जेव्हा सगळं न मागताच मिळतं तेव्हा काही मागायची गरज काय? असा प्रतिप्रश्न करत उत्तर दिले. यातून अर्थात त्यांना मुलाला म्हणजेच आदित्य यांना सुनवायचं नव्हेतच मात्र काही काळासाठी हे उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये हशा पिकला. दुसरीकडे मग आदित्य यांनीच मी मुख्यमंत्र्यांच्या समोर काहीही बोलणार नाही असे म्हणत वेळ मारून नेली .

अयोध्या राम मंदिर उभारणीसाठी शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांचा निधी; उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

वास्तविक जेव्हा आपण अयोध्येला येतो त्यावेळेस आपल्या सोबत काहीतरे चांगले घडते, असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे, मागील नोव्हेंबर महदये अयोध्येत येताच आपण मुख्यमंत्री झालो, त्यानंतर सरकार स्थापन झाले आणि आता या सरकारला 100 दिवस पूर्ण झालेत हे सर्व न मागता मिळालेलं आहे असा उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याचा आशय होता. मात्र हेच बोलत असताना आदित्य यांना त्यांचा अलगद टोला बसला. आदित्य ठाकरे हे सध्याच्या तरुणाईचे प्रतिनिधित्व असणारे मंत्री आहेत, त्यांनी वरळी मतदारसंघातून विजय मिळवत ठाकरे कुटुंबातील पहिला वाहिला आमदार ठरण्याचा मान मिळवला होता. यानंतर आता साड्या ते पर्यटन आणि पर्यावरण मंत्री म्ह्णून काम करतात.

दरम्यान, दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी आपल्या वक्तव्यातून भाजपला टोलवण्याचे काम सुद्धा केले, मी जेव्हा मुख्यमंत्री नव्हतो प्रामाणिक श्रद्धेतून अयोध्येत दर्शनाला आलो होतो, जे लोक आता आमच्यावर टीका करत आहेत,त्यांना आधी अयोध्येत येऊ तर दे. असे उद्धव यांनी म्हंटले आहे. तर, भाजप सोडून महाविकासाआघाडी स्थापन करण्याच्या बाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून, आम्ही भाजपची साथ सोडली आहे, हिंदुत्वाची नाही, तसेच भाजप आणि हिंदुत्व वेगवेगळे आहे. असेही ठाकरे यांनी सांगितले.