Tourist Family Attacked in Goa: गोव्यात पर्यटन करण्यास आलेल्या कुटुंबियावर जिवघेणा हल्ला; मुख्यामंत्र्यांनी दिले कठोर कारवाईचे आदेश
या पर्यटकांने स्वत: या घटनेचा व्हिडीयो सोशल मिडीयावर शेअर केला असून गोवा सुरक्षीत नसल्याचे म्हटले आहे.
गोव्यातील (GOA) अंजुना (Anjuna) येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. या पर्यटकांने स्वत: या घटनेचा व्हिडीयो सोशल मिडीयावर शेअर केला असून गोवा सुरक्षीत नसल्याचे म्हटले आहे. जतिन शर्मा यांने याबाबत आपल्या इन्स्टाग्रामवर या घटनेचे दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये काही लोक त्यांच्यावर तलवार आणि चाकुने हल्ला करताना दिसत आहेत आणि त्यांचे कुटुंबिय हे गंभीररित्या जखमी झाल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले शर्मा कुटुंबिय दिसत असून त्यांना रुग्णालयात नेत असल्याचे देखील दिसत आहे. दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सांवत (Pramod Sawant) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
पहा व्हिडीओ -
आपल्या सोशल मिडीयाच्या पोस्टवर जतिन शर्मा यांनी लिहले आहे की "आम्ही गोव्याला आल्यानंतर ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो त्या ठिकाणाहून दुसऱ्या रिसॉर्टवर जाणार होतो त्यावेळी हॉटेलच्या एका कर्मचाऱ्यांनी आपल्या काही साथीदारांसह आपल्या कुंटुंबियांवर हल्ला केला. या घटनेच्या प्रकरणी पोलिसांनी देखील चार हल्लेखोरांना अटक केली, पण पोलिसांनी त्यांच्यावर 307 हा कलम (खुनाचा प्रयत्न) न लावता त्यांच्यावर 324 हा कलम (घातक शस्त्रांनी इजा पोहोचवणे) दाखल केला, तसेच एफआयआरमध्ये संशयितांची नावे देखील नाहीत." स्थानिक गुंडाच्या दबावामुळे हा कलम बदलण्यात आल्याचा आरोप जतिन शर्मा यांनी केला.
पहा ट्विट -
दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सांवत यांनी देखील या घटनेची दखल घेत दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच राज्यातील लोकांच्या शांतता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देखील त्यांनी दिला.