भारतात कोविड 19 च्या एकूण 26 लाखांहून अधिक सॅपल टेस्ट तर मागील 24 तासांत 1 लाखाहून अधिक नागरिकांची चाचणी- ICMR ची माहिती
याच पार्श्वभूमीवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने आतापर्यंत कोविड 19 च्या तब्बल 26,15,920 सॅपल टेस्ट केल्या आहेत.
भारतातील कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग वाढत असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (Indian Council of Medical Research) आतापर्यंत कोविड 19 (Covid 19) च्या तब्बल 26,15,920 सॅपल टेस्ट केल्या आहेत. त्यापैकी 1,03,532 सॅपल टेस्ट (Samples Test) मागील 24 तासांत करण्यात आल्या आहेत. दिवसागणित कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. देशात कोरोना बाधितांचा आकडा 1 लाखाच्या वर गेला असून मृतांचा आकडा 3 हजारांच्या पार गेला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 5,609 कोरोनाग्रस्त नवे रुग्ण आढळून आले असून 132 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 1,12,359 इतका झाला असून अद्याप 63624 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर एकूण 3435 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान महाराष्ट्रात अधिक नागरिक कोरोना व्हायरसच्या कचाट्यात सापडले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 39297 झाला असून यात 1,390 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Coronavirus In India: भारतामध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,12,359 ; मागील 24 तासामध्ये वाढले 5,609 नवे रूग्ण)
ANI Tweet:
18 मे रोजी भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारताचा रिकव्हरी रेट सुधारला असून 38.29% इतका आहे. एका दिवसाला 2,700 रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. त्यामुळे देशातील लोकसंख्येनुसार आतापर्यंत असलेल्या कोरोना बाधितांचा आकडा हा लाखामागे 7.1 रुग्ण असा आहे.