श्रीनगर रेल्वे स्थानकाने पांघरली बर्फाची जाड चादर; पहा निसर्गाची किमया दाखवणारे Videos

यामुळे वाहतुकीचे सर्व मार्गही ठप्प झाले आहेत. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग देखील सध्या बंद करण्यात आला आहे. यातच बर्फवृष्टीमुळे तेथील नेमकी परिस्थिती दाखवणारे व्हिडिओज समोर आले आहेत.

Srinagar Railway Station (Photo Credits: Twitter)

निसर्गसौंदर्य, सुखद वातावरण, बर्फवृष्टीचा आनंद सारं काही एकाच ठिकाणी अनुभवात येणारी जागा म्हणजे जम्मू-काश्मीर (Jammu & Kashmir). या प्रदेशाच्या याच खुबीमुळे त्याला भारतातील स्वर्ग म्हटले जाते. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर मध्ये तुफान बर्फवृष्टी होत आहे. यामुळे वाहतुकीचे सर्व मार्गही ठप्प झाले आहेत. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग देखील सध्या बंद करण्यात आला आहे. यातच बर्फवृष्टीमुळे तेथील नेमकी परिस्थिती दाखवणारे व्हिडिओज समोर आले आहेत. श्रीनगर रेल्वे स्टेशनवरील (Srinagar Railway Station) हे व्हिडिओज रेल्वे मंत्रालयाने (Ministry Of Railway) शेअर केले आहेत.

हे व्हिडिओज शेअर करताना रेल्वे मंत्रालयाने ट्विटमध्ये लिहिले की, "या हिवाळ्यातील एक नेत्रदीपक दृश्य! श्रीनगर रेल्वे स्थानक- निसर्गाच्या हिमवर्षावाने आच्छादले गेले. रेल्वे ट्रॅकवरून बर्फ हटवण्याचे काम सध्या सुरु आहे."

पहा व्हिडिओज:

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल की, श्रीनगर रेल्वे स्थानकाने बर्फाची जाड चादर पांघरली आहे. रेल्वे ट्रॅक, स्टेशन, रेल्वे सर्व काही बर्फाने झाकून गेले आहे. व्हिडिओत दूरवर नजर गेली तरी सर्वत्र बर्फच बर्फ दिसत आहे. ट्रॅकवरील बर्फ हटवण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यातूनही बर्फाचा भलामोठा फरावा बाहेर येत असल्याचे दिसत आहे. या विलोभनीय दृश्यातून निसर्गाची किमया दिसून येते.

दरम्यान, तुफान बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिकांच्या मदतीला लष्काराचे जवान धावून येत आहेत. बर्फवृष्टीमुळे मार्ग बंद असल्याने नवजात बाळाला आणि आईला जवानाने स्ट्रेचरवरुन घरी पोहचवले. त्यासाठी त्याने तब्बल 3.5 किमीचा पायी प्रवास केला. त्याचबरोबर 5 जानेवारी रोजी एका गर्भवती महिलेला हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यासाठी जवानांनी 2 किमी चा प्रवास केला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif