Shiv Sena Leader Shot Dead: शिवसेना नेत्याची गोळी घालून हत्या, 12 वर्षांचा मुलगा जखमी; पंजाबमधील मोगा येथील घटना
Law and Order in Punjab: पंजाबमधील मोगा येथे शिवसेना नेते मंगत राय उर्फ मंगा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हल्ल्यात 12 वर्षांचा मुलगाही जखमी झाला.
शिवसेना (Shiv Sena) नेते मंगत राय उर्फ मंगा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पंजाबमधील (Punjab Crime) मोगा (Moga Shooting) येथे गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या एका धक्कादायक घटनेत, 12 वर्षांचा मुलगा देखील जखमी झाला. पोलिसांनी या हत्येचा तपास सुरू केला आहे, अनेक संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोगा येथे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मंगत राय (52) यांच्यावर रात्री 10 वाजताच्या सुमारास तीन अज्ञात हल्लेखोरांनी किराणा सामान खरेदी करण्यासाठी बाहेर पडले असताना हल्ला (Shiv Sena Leader Killed) केला. प्राप्त माहितीनुसार, पहिली गोळी मंगा यांना चुकवून तेथून जाणाऱ्या 12 वर्षांच्या मुलाला लागली. धोका ओळखून, मंगा यांनी दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला आणि पुन्हा गोळीबार केला, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय
पंजाबमधील गुन्हेगारी विश्वाचे दर्शन घडविणाऱ्या या हल्ल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या शिवसेना नेते मंगत राय उर्फ मंगा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, जखमी मुलाला सुरुवातीला मोगा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि नंतर प्रगत उपचारांसाठी दुसऱ्या वैद्यकीय सुविधेत हलवण्यात आले. मंगाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सहा संशयित आणि अनेक अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांना या हत्येमागे वैयक्तिक वैमनस्य असल्याचा संशय आहे, परंतु पीडितेच्या कुटुंबाने पूर्वीचे कोणतेही वैमनस्य नसल्याचे नाकारले आहे. (हेही वाचा, Amritsar Shocker: खंडणी देण्यास नकार दिल्याने अमृतसरमध्ये NRI वर गोळीबार, रुग्णालयात मृत्यूशी झूंज सुरू (Watch Video))
पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत निदर्शने
हत्येमुळे संतप्त झालेल्या मंगाच्या कुटुंबाने आणि स्थानिक संघटनांनी मोगा येथील प्रताप चौकात निदर्शने केली आणि जलद न्याय आणि तात्काळ अटक करण्याची मागणी केली. पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत निदर्शकांनी आप सरकारविरुद्ध घोषणाबाजीही केली. (हेही वाचा, Online Child Porn Racket Busted in Punjab: चाइल्ड पोनोग्राफी प्रसारित करणाऱ्या रॅकेटचा पदार्फाश, पंजाब पोलिसांकडून एकास अटक)
मंगाच्या मुलीने पीटीआयशी बोलताना सांगितले की, तिचे वडील रात्री 8 वाजता दूध खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले होते. रात्री 11 वाजता आम्हाला बातमी मिळाली की माझ्या वडिलांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. आम्ही न्यायाची मागणी करतो आणि कारवाई होईपर्यंत मागे हटणार नाही, असे ती म्हणाली.
दरम्यान, मंगत राय उर्फ मंगा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली त्याच रात्रीच्या दुसऱ्या घटनेत आणखी एक गोळीबाराची घटना घडली. त्याच रात्री 9 वाजताच्या सुमारास तीन सशस्त्र व्यक्तींनी बागियाना बस्ती येथील एका सलूनमध्ये प्रवेश केला आणि मालक देवेंदर कुमार यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी कुमार यांच्या पायात लागली आणि त्यांना तातडीने मोगा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी दुसऱ्या वैद्यकीय सुविधेत पाठवण्यात आले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)