राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर अटकेनंतर आज संजय राऊत कर्नाटकला जाणार; हिंमत असेल तर कायद्याने रोखून दाखवा म्हणत सरकारला आव्हान
"कर्नाटक सरकारची ही दडपशाही सहन केली जाणार नाही आणि तरीही जर का हिंमत असेल तर मला कायद्याने अडवून दाखवा" असे आव्हान राऊत यांनी दिले असून आज दुपारी 2 वाजता ते कर्नाटक मध्ये दाखल होणार आहेत.
सीमा लढ्यातील शहिद हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव (Belgaon) येथील हुतात्मा चौकात (Hutatma Chowk) गेलेल्या महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना काल 17 जानेवारी रोजी कर्नाटक पोलिसांनी अटक केल्यामुळे महाराष्ट्र (Maharashtra)- कर्नाटक (Karnatak) वाद आणखीनच चिघळला गेला आहे. याच पार्श्वभुमीवर आज शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे देखील पोलिसांना आव्हान करत कर्नाटकात जाणार आहेत. "मी, राज्यसभेचा खासदार आहे, आणि देशाचा नागरिक म्ह्णून मला मनाप्रमाणे कोणत्याही ठिकाणी जाण्याचे स्वातंत्र्य आहे, कर्नाटक सरकारची ही दडपशाही सहन केली जाणार नाही आणि तरीही जर का हिंमत असेल तर मला कायद्याने अडवून दाखवा" असे आव्हान राऊत यांनी दिले असून आज दुपारी 2 वाजता ते कर्नाटक मध्ये दाखल होणार आहेत.
संजय राउत ट्वीट
प्राप्त माहितीनुसार, सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना दरवर्षी 17 जानेवारी रोजी बेळगावच्या हुतात्मा चौकात अभिवादन केले जाते. मात्र यंदा या दिवशी कोणत्याही राजकीय व्यक्तींना बेळगावात येण्यापासून मज्जाव करण्यात आला होता, असे असूनही काल राज्य आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे शुक्रवारी मध्यरात्रीच बेळगावात दाखल झाले होते. कोणताही सरकारी फौजफाटा न घेता गेल्याने ते सुरवातीला कोणाच्या नजरेत आले नाहीत.मात्र हुतात्मा चौकात अभिवादन करण्यासाठी पोहचताच पोलिसांनी त्यांना अडवून धक्काबुक्की करत अटक केली.
दरम्यान, या सर्व प्रकरणी आज यड्रावकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधणार आहेत. तर, कर्नाटक पोलिसांना आव्हान करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आज कर्नाटकात काही कारवाई होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.