Ranthambore's Tigress Arrowhead Dies: मगरींची शिकार करणारी रणथंबोरची वाघीण 'अ‍ॅरोहेड'चा मृत्यू

अ‍ॅरोहेडने एका जलाशयात मगरीची शिकार केली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. वाघिणीच्या शिकार कौशल्यामुळे तिला 'रणथंभोर की राणी' आणि 'मगर शिकारी' म्हणून ओळखले जात असे.

Ranthambore's Tigress Arrowhead Dies (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Ranthambore's Tigress Arrowhead Dies: रणथंभोर राष्ट्रीय उद्यानातील प्रसिद्ध वाघिणी 'अ‍ॅरोहेड' (Tigress Arrowhead) चा मृत्यू झाला आहे. अ‍ॅरोहेडला T-84 म्हणूनही ओळखले जात होती. ती सुमारे 11 वर्षांची होती. अ‍ॅरोहेड वाघिणीचा जन्म फेब्रुवारी 2014 मध्ये झाला होता. अ‍ॅरोहेडचा मृत्यू ब्रेन ट्यूमरमुळे झाला. अ‍ॅरोहेड वाघिणी काही काळापूर्वी चर्चेचा विषय बनली होती. अ‍ॅरोहेडने एका जलाशयात मगरीची शिकार केली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. वाघिणीच्या शिकार कौशल्यामुळे तिला 'रणथंभोर की राणी' आणि 'मगर शिकारी' म्हणून ओळखले जात असे.

गुरुवारी रणथंभोर वन अधिकाऱ्यांनी अ‍ॅरोहेडला श्रद्धांजली वाहिली आणि नंतर तिचे अंत्यसंस्कार केले. रणथंभोर क्षेत्र संचालक अनुप केआर यांनी सांगितले की अ‍ॅरोहेड बहुतेकदा रणथंभोरच्या झोन 2,3, 4 आणि 5 मध्ये दिसायची. नलघाटी आणि राजबाग तलाव हे तिचे मुख्य क्षेत्र होते. अ‍ॅरोहेड तिच्या आकर्षक दिसण्यासाठी प्रसिद्ध होती, तसेच तिने वाघांची संख्या वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

अ‍ॅरोहेड वाघिणीचा मृत्यू - 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranthambore National Park (@ranthambhorepark)

प्राप्त माहितीनुसार, अ‍ॅरोहेड एकूण 4 वेळा आई बनली. तिने 10 बछड्यांना जन्म दिला. यापैकी 6 अजूनही जिवंत आहेत. अ‍ॅरोहेड शेवटी 2023 मध्ये आई झाली होती. एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुरुवारी सकाळी आरटीआर झोन 2 मध्ये अ‍ॅरोहेड मृतावस्थेत आढळली. मागील बऱ्याच दिवसांपासून ती आजारी होती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement