Rajasthan Politics: राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, 32 नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश

काँग्रेस नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपच्या गोटामध्ये उत्साह दुणावला आहे. यामुळे भाजपने राजस्थानने पुन्हा एकदा 25 पैकी 25 जागा जिंकण्याचा दावा केला आहे.

Congress, BJP | (File Image)

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) आधीच राजस्थान काँग्रेसला (Rajasthan Congress) मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या 32 नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांचे जवळचे नेते माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते लालचंद कटारिया यांच्यासहित 32 नेत्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, (Bhajanlal Sharma) राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी आणि केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला आहे.  (हेही वाचा -  TMC Lok Sabha Candidates List 2024: टीएमसी कडून 42 उमेदवारांची यादी जाहीर; क्रिकेटर Yusuf Pathan, Mahua Moitra निवडणूकीच्या रिंगणात)

काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये जाट नेत्यांचा सामावेश आहे. काँग्रेस नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपच्या गोटामध्ये उत्साह दुणावला आहे. यामुळे भाजपने राजस्थानने पुन्हा एकदा 25 पैकी 25 जागा जिंकण्याचा दावा केला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांमध्ये लालचंद कटारिया यांच्यासह गहलोत सरकारमध्ये मंत्री राहिलेले राजेंद्र यादव, माजी आमदार रिछपाल मिर्धा, खिलाडीलाल बैरवा, अलोक बेनीवाल, विजयपाल मिर्धा, भीलवाडाचे माजी जिल्हाध्यक्ष रामपाल शर्मा यांचा समावेश आहे.

आंतरात्म्याच्या संकेतामुळे मी भाजपमध्ये सहभागी झालो आहे. मु्ख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला पुढे नेण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा पक्षप्रवेश लोकसभेपुर्वी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. काही महिन्यापुर्वीच झालेल्या राजस्थान प्रदेशच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा पराभव पहायला मिळाला होता.