Pranab Mukherjee Health Update: माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची प्रकृती स्थिर मात्र अजुनही व्हेंटिलेटर वर, आजही तब्येतीत सुधारणा नाही

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (Former President Pranab Mukharjee) यांंच्या तब्येती संदर्भात आर्मी हॉस्पिटल (Army Hospital) तर्फे अपडेट समोर येत आहे. आज सकाळी प्रणब मुखर्जी यांची प्रकृती स्थिर होती. मात्र अद्यापही त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले आहे.

Former President Pranab Mukherjee | File Image | (Photo Credits: PTI)

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (Former President Pranab Mukharjee) यांंच्या तब्येती संदर्भात आर्मी हॉस्पिटल (Army Hospital) तर्फे अपडेट समोर येत आहे. आज सकाळी प्रणब मुखर्जी यांची प्रकृती स्थिर होती. त्यांंचे महत्त्वपूर्ण आणि क्लिनिकल पॅरामीटर्स स्थिर आहेत आणि तज्ञांच्या टीमद्वारे त्यांचे बारकाईने निरीक्षण केले जात आहे. मात्र अद्यापही त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले आहे. अजुनही त्यांंच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नसल्याने त्यांना व्हेंटिलेटर वर ठेउनच उपचार सुरु आहेत. काल, 96 तासांचा त्यांचा observation period संपला होता. त्यांचे शरीर External Stimuli आणि उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती आर्मी हॉस्पिटल तर्फे देण्यात आली आहे.

10 ऑगस्टला प्रणब मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून सांगण्यात आले. त्यानंतर दिल्लीच्या आर्मी आर अ‍ॅन्ड आर हॉस्पिटलमध्ये मेंदूत झालेल्या गाठीचे ऑपरेशन झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान तेव्हापासूनच प्रणब मुखर्जी व्हेटिंलेटरवर आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने आता चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

ANI ट्विट

दरम्यान, मध्यंंतरी पत्रकार राजदीप सरदेसाई यांंनी प्रणब मुखर्जी यांंच्या निधनाचे ट्विट करत त्यांना थेट श्रद्धांजली वाहिली होती, यावरुन मोठा गोंंधळ झाला होता, मात्र त्या नंंतर प्रणब मुखर्जी यांंचे चिरंजीव अभिजीत मुखर्जी यांंनी स्पष्टीकरण देत प्रणब यांंची प्रकृती नाजुक असली तरी स्थिर असल्याची माहिती दिली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement