Pranab Mukherjee Health Update: माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी अजुनही कोमात; व्हेंंटिलेटर वर उपचार सुरु

प्रणब मुखर्जी यांंची प्रकृती सध्या चिंंताजनक असुन ते सध्या कोमात आहेत. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाले आहे. सध्या व्हेंटिलेटर वर उपचार सुरु आहेत.

Pranab Mukherjee Health Update: माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी अजुनही कोमात; व्हेंंटिलेटर वर उपचार सुरु
Former President Pranab Mukherjee | File Image | (Photo Credits: PTI)

Pranab Mukherjee Health Update Today: दिल्ली (Delhi) च्या आर्मी रिसर्च आणि रेफरल हॉस्पिटल मधून (Research and Referral Hospital) माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) यांच्या तब्येतीचे अपडेट आले आहेत. यानुसार अजुनही त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नसल्याची माहिती समजत आहे. प्रणब मुखर्जी यांंची प्रकृती सध्या चिंंताजनक असुन ते सध्या कोमात आहेत. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाले आहे. सध्या व्हेंटिलेटर वर उपचार सुरु आहेत. त्यांचे व्हायटल पॅरामीटर्स (Vital Parameters) स्थिर आहेत. दरम्यान त्यांच्या प्रकृतीकडे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम लक्ष ठेऊन आहे.

प्राप्त माहितीनुसार, 10 ऑगस्ट रोजी ब्रेन सर्जरी झाल्यापासून प्रणब मुखर्जी यांची प्रकृती खालावली असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. आज 13 दिवसांनंतरही त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसून आलेली नाही. दरम्यान त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटीव्ह आली असून त्यांना इतर जुने विकारही असल्याने चिंंता आहे.

ANI Tweet

दरम्यान प्रणब मुखर्जी यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी आणि मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी हे प्रकृतीचे अपडेट्स देत असतात. 13 ऑगस्ट रोजी प्रणब मुखर्जी यांच्या निधनाची खोटी बातमी समोर आली होती. त्यानंतर मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करुन वडीलांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगत अफवांचे खंडन केले होते.

(The above story first appeared on LatestLY on Aug 23, 2020 12:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).