PPF मध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी खबर, पैसे काढण्यासंदर्भातील नियमात बदल
कारण सरकारकडून नियमात बदल करण्यात आले आहेत. भारत सरकारने पीपीएफ योजना 2019 बाबत एक नोटिस जारी केली आहे.
पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF) मध्ये जर तुम्ही पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. कारण सरकारकडून नियमात बदल करण्यात आले आहेत. भारत सरकारने पीपीएफ योजना 2019 बाबत एक नोटिस जारी केली आहे. त्यानुसार पीपीएफ खाते वेळेपूर्वी बंद करण्याच्या नियमात बदल केले आहेत. पीपीएफ खात्यात वर्षाला 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास कलम 80C अंतर्गत कराची सूट ग्राहकांना मिळते. व्याजवर सुद्धा कोणताही टॅक्स लागत नाही. मॅच्युरिटी मिळाल्यावर याची रक्कम टॅक्सअंतर्गत येत नाही. याच कारणामुळे ग्राहक त्यांच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ खाते सुरु करतात. याच्या मदतीने गुंतवणूकीदारांना फार मोठा लाभ होतो.
पीपीएफ योजना 2019 अंतर्गत 5 वर्ष आर्थिक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी खाते बंद करण्याची सुविधा दिली आहे. तर 2016 मध्ये सरकारने पीपीएफ खाते मर्यादित कालावधीपूर्वी बंद करण्याची परवानगी दिली होती. मात्र आताच्या योजनेअंतर्गत बदलण्यात आलेल्या नियमानुसार, तिसऱ्या आधारानुसार असून खातेधारकाला त्यांनी जर निवास स्थान बदलल्यास तर पीपीएफ खाते बंद करु शकतो. मात्र हे पीपीएफ खाते सुरु करुन 5 वर्ष झालेली असणे गरजेचे आहे. यासाठी एक स्पेशल फॉर्म 5 तयार करण्यात आाल आहे.(SBI मध्ये PPF खाते सुरु करुन मिळवा भरघोस व्याज, जाणून घ्या ऑनलाईन प्रक्रिया)
यापूर्वी सरकारने खातेधारक, पती किंवा पत्नी किंवा मुले बाळे यांना काही आजार झाल्यास पीपीएफ खाते मर्यादित कालावधीपूर्वी बंद करण्याची परवानगी दिली होती. ही सुविधा अद्याप सुद्धा कायम सुरु ठेवण्यात आली आहे.पीपीएफ ही सुविधा ग्राहकांना सरकारकडून छोट्या स्वरुपातील बचतीचा एक प्रकार आहे. यावर व्याजदर केंद्र सरकारकडून तीन महिन्यातून एकदा निर्धारित केला जातो. सध्या पीपीएफ खात्यावर 7.9 टक्के वर्षभरासाठी व्याज दर ठेवण्यात आला आहे. पीपीएफ खात्यात कमीतकमी 500 रुपये ठेवून सुरु करता येते. तसेच जास्तीत जास्त रक्कम एका वर्षासाठी 1.15 लाख रुपये जमा करु शकता.