Political Party Donations: भाजपला 2021-22 या आर्थिक वर्षात देणग्यांमधून मिळाले 614 कोटी, तर काँग्रेसला प्राप्त झाले 95 कोटी- ADR Reports

अहवालानुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात काँग्रेसला मिळालेली देणगी 74.524 कोटी होती, जी 2021-22 या आर्थिक वर्षात वाढून 95.459 कोटी झाली आहे.

BJP,Congress | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अहवालात समोर आले आहे की, भारतीय जनता पक्षाला (BJP) गेल्या वर्षी 614.6 कोटी रुपये देणग्या मिळाल्या आहेत, तर काँग्रेसला (Congress) 95.4 कोटी रुपये मिळाले आहेत. हा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. यानुसार, गेल्या आर्थिक वर्षात राष्ट्रीय पक्षांनी घोषित केलेल्या 20 हजारांहून अधिक देणग्या 780.77 कोटी होत्या, ज्या एकूण 7141 डोनेशन्समधून प्राप्त झाल्या होत्या.

अहवालात असे म्हटले आहे की, भाजपने 4,957 देणग्यांमधून एकूण 614.626 कोटी रुपये जाहीर केले आहेत. यानंतर काँग्रेसने 1,255 देणग्यातून 95.45 कोटी रुपये जाहीर केले. भाजपकडून जाहीर केलेल्या देणग्या ह्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), नॅशनल पीपल्स पार्टी आणि ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस यांनी जाहीर केलेल्या देणग्यांच्या तिप्पट आहेत.

बहुजन समाज पक्षाने (BSP) सलग 16 व्या वर्षी 20,000 रुपयांपेक्षा जास्त देणगी मिळाली नसल्याचे जाहीर केले. अहवालात असे म्हटले आहे की, 2021-22 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय पक्षांच्या एकूण देणगीत 187.026 कोटींची वाढ झाली आहे, जी मागील आर्थिक वर्ष 2020-21 पेक्षा 31.50 टक्के अधिक आहे. 2020-21 मध्ये भाजपला मिळालेली देणगी 477.545 कोटी होती, जी 2021-22 मध्ये 614.626 कोटी झाली. ज्यामध्ये 28.71 टक्क्यांची वाढ दिसून आली. (हेही वाचा: Suicide: तीन वर्षात तब्बल 1.12 लाख रोजंदारी कामगारांनी केल्या आत्महत्या, केंद्राची लोकसभेत माहिती)

अहवालानुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात काँग्रेसला मिळालेली देणगी 74.524 कोटी होती, जी 2021-22 या आर्थिक वर्षात वाढून 95.459 कोटी झाली आहे. यामध्ये 28.09 टक्के वाढ दिसून आली. आर्थिक वर्ष 2019-20 आणि आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान काँग्रेसच्या देणगीत 46.39% ची घट झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement