IPL Auction 2025 Live

Mann Ki Baat, June 28, 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या 'मन की बात' कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रीमिंग येथे पहा

तसंच भारत-चीन तणाव हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलणार, याकडे देशवासियांचं लक्ष लागलं आहे.

PM Narendra Modi | (Photo Credits: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra) आज सकाळी 11 वाजता 'मन की बात' (Mann Ki Baat) या रेडिओ प्रोग्रॅममधून जनतेशी संवाद साधणार आहेत. 'मन की बात' या कार्यक्रमाचा आज 66 वा एपिसोड पार पडणार आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर तब्बल दोन महिन्यांनी देश अनलॉक व्हायला सुरुवात झाली. अनलॉक 1.0 (Unlock 1) सुरु झाल्यानंतरचा मन की बात चा हा पहिला एपिसोड आहे. तसंच भारत-चीन तणाव हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे.  त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलणार, याबद्दल देशवासियांच्या मनात उत्सुकता आहे.

'मन की बात' हा रेडिओ प्रोग्रॅम ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर वर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी लेटेस्ट घडामोडी, समस्या यासंदर्भात जनतेशी संवाद साधतात. त्यामुळे आज अनलॉक 2.0 आणि भारत-चीन सीमेवरील तणावाबद्दल मोदी जनतेशी संवाद साधतील अशी आशा आहे. त्याचबरोबर 30 जून रोजी अनलॉक 1.0 संपणार असून देशातील वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येच्या मोदी यापुढे कोणती पाऊले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येथे पहा Live Streaming:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 11 वाजता होणाऱ्या मन की बात या रेडिओ कार्यक्रमाबद्दल शनिवारी आपल्या ट्विटर हॅंडलवर नागरिकांना पुन्हा एकदा आठवण करुन दिली होती. कोरोना व्हायरस संकट काळात मोदींनी सर्व भारतवासियांना मास्क घालण्याचे आणि सोशल डिस्टसिंगचे नियम पाळण्याचे आवाहन केले होते. त्याचप्रमाणे लोकांनी अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडू नये असेही त्यांनी सूचित केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी 31 मे रोजी मन की बात द्वारे जनतेशी संवाद साधला होता. त्या कार्यक्रमात योगाचे महत्त्व सांगत कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योगसाधना करणे आवश्यक असल्याचेही म्हटले होते.