IPL Auction 2025 Live

J&K Bus Attack Update: जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा हल्ला; बस दरीत कोसळून 10 जणांचा मृत्यू

ते म्हणाले, बस दरीत कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. काही दहशतवाद्यांनी या बसवर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे.

जम्मू-काश्मीरच्या रेसाई जिल्ह्यात एक बस दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत 33 प्रवाशी जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या बसवर दहशतवाद्यांकडून गोळीबार (Firing on bus) करण्यात आला. त्यानंतर ही बस दरीत जाऊन कोसळली. ही बस भाविकांना घेऊन शिवखोडी मंदिराच्या दिशेने जात होती. ही बस दरीत जोरात आदळल्याने आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी मदतीला धावून येत बसमधून जखमींना बाहेर काढले आणि रस्त्यापर्यंत उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेपर्यंत नेले. (हेही वाचा - जम्मू आणि काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून 10 जणांचा मृत्यू)

पाहा व्हिडिओ -

रियासी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विशेष महाजन यांनी या दुर्घटनेची पुष्टी केली आहे. ते म्हणाले, बस दरीत कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. काही दहशतवाद्यांनी या बसवर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. यात्रेकरुंची ही बस शिव खोडी मंदिरात दर्शनासाठी जात होती. ही बस पोनी येथील तेरियात गावातून निघाली होती. लष्कर आणि निमलष्करी दलाच्या तुकड्यादेखील तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. लष्करी तुकड्यांनी देखील मदतकार्य सुरू केलं आहे. तसेच या परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.

ही बस कटरा शहरातील शंकराचे देऊळ असलेल्या शिव खोरी इकडे जात होती. ही बस रस्त्यावरुन जाताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यामुळे बस रस्त्यालगत असलेल्या अरुंद घळीत जाऊन कोसळली. हा परिसर रेसाई आणि राजौरी जिल्ह्याच्या सीमेवर आहे.