भारत देशात सलग 28 व्या दिवशी पेट्रोल डिझेल चे दर कायम; जाणून घ्या मुंबई, दिल्ली सह इतर शहरांमधील इंधनाच्या किंमती
दिवसेंदिवस या संकटाची तीव्रता वाढताना दिसत आहे. याचा परिणाम सर्वच बाबतीत दिसून येत असून पेट्रोल डिझेलच्या दरातही यामुळे कोणतीही वाढ झालेली नाही.
सध्या देशभरात कोरोना विषाणूंचे संकट घोंगावत आहे. दिवसेंदिवस या संकटाची तीव्रता वाढताना दिसत आहे. याचा परिणाम सर्वच बाबतीत दिसून येत असून पेट्रोल डिझेलच्या दरातही यामुळे कोणतीही वाढ झालेली नाही. गेल्या महिन्याभरापासून भारत देशात पेट्रोल डिझेलचे दरात कोणतीही वाढ झाली नसल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवार, 13 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सलग 28 दिवसांनंतरही कायम राहिल्या आहेत. इंडियन ऑईल कॉरपोरेशनच्या (Indian Oil Corporation) अधिकृत वेबसाईटनुसार, दिल्लीत पेट्रोलचे दर 69.59 प्रति लीटर असून मुंबई मध्ये 76.31 रुपये प्रति लीटर आहे. कोलकता मध्ये पेट्रोलची किंमत 73.30 रुपये असून चेन्नईत पेट्रोल 72.28 रुपये प्रति लीटरने उपलब्ध आहे.
डिझेलच्या किंमतीतही कोणतीही वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. दिल्लीमध्ये डिझेल 62.29 रुपये प्रति लीटरने मिळत आहे. तर मुंबईत डिझेलची किंमत 66.21 रुपये प्रति लीटर आहे. कोलकता आणि चेन्नईत डिझेल अनुक्रमे 65.62 रुपये, 65.71 रुपये प्रति लीटरने उपलब्ध आहे.
पहा पेट्रोल डिझेलचे दर:
मेट्रो सिटी | पेट्रोल दर प्रति लीटर | डिझेल दर प्रति लीटर |
मुंबई | रु. 75.31 | रु. 65.21 |
दिल्ली | रु. 69.59 | रु. 62.29 |
चेन्नई | रु. 72.28 | रु. 65.71 |
कोलकता | रु. 73.30 | रु. 64.62 |
ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी भारतातील पेट्रोल, डिझेच्या किंमतींच्या तयार केलेल्या अहवालानुसार, 2017 पासून भारतातील इंधनाचे दर प्रत्येक दिवशी सकाळी 6 वाजता बदलत होते. तर त्यापूर्वी या किंमतीत दर 15 दिवसांनी फरक दिसून येत होता.
लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यात इंधनाचे दर सुमारे 66% नी घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑयलचे दर घसल्याने सध्या पेट्रोल-डिझेलच्या दरात स्थिरता पाहायला मिळत आहे. इंधनाचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑयलची किंमत आणि रुपया-डॉलर यातील एक्स्जेंच रेट वर अवलंबून असतात.