Petrol and Diesel Prices in India: इंधनदराच्या कपातीनंतर आज सलग दुसर्या दिवशी दर कायम
दरम्यान प्रत्येक शहरात इंधन दर वेगवेगळे असण्यामागे त्या राज्यातील वॅट चा समावेश असतो.
ऑईल मार्केटिंग कंपनी (Oil Marketing Company) कडून आज (23 ऑगस्ट) दिवशी इंधनाचे दर कायम ठेवण्यात आले आहेत. काल पेट्रोल आणि डिझेल च्या दरांमध्ये कपात केल्यानंतर आज सलग दुसर्याच दिवशी इंधनाचे दर तसेच कायम ठेवण्यात आले आहेत. मागील काही महिन्यात पेट्रोल, डिझेलचे दर चढते राहिले आहेत पेट्रोलने प्रति लीटर 100 री पार केली आहे. मुंबई मध्ये पेट्रोलचा दर प्रति लीटर 107.66 आहे तर डिझेलचा दर 96.64 रूपये प्रति लीटर आहे. यंदा मुंबईत 29 मे दिवशी पेट्रोलचे दर शंभरी पार गेले आहेत.
भारतातील 4 प्रमुख शहरांपैकी पेट्रोल,डीझेलचे दर मुंबई मध्ये सर्वाधिक आहेत. दरम्यान प्रत्येक शहरात इंधन दर वेगवेगळे असण्यामागे त्या राज्यातील वॅट चा समावेश असतो.
भारतातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल, डिझेलचे दर काय?
दिल्ली- 101.64 (पेट्रोल दर), 89.07 (डिझेलचे दर)
मुंबई- 107.66 (पेट्रोल दर), 96.64 (डिझेलचे दर)
चैन्नई- 99.32 (पेट्रोल दर), 93.66 (डिझेलचे दर)
कोलकाता- 101.93 (पेट्रोल दर), 92.13 (डिझेलचे दर)
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे पेट्रोल, डिझेलचे दर इथे पहा.
इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियन यांच्याकडून दररोज सकाळी 6 वाजता नवे दर जाहीर केले जातात. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईल, रूपये-डॉलर चा एक्सचेंज रेट अवलंबून आहे.