Onion Price Update: गोवा सरकार रेशनकार्ड धारकांना कांदा प्रतिकिलो 32 रूपये दराने उपलब्ध करून देणार

महाराष्ट्राच्या नाशिक कांदा बाजारातून कांद्याची खरेदी करून गोव्यात (Goa) तो रेशनकार्ड धारकांना (Ration Card Holders) सुमारे 32 रूपये प्रतिकिलो इतक्या माफक दरात उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती समोर आली आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

भारतामध्ये सध्या कांदा शेतकर्‍यांना आणि सामान्यांनादेखील रडवत आहे. एकीकडे कांद्याचे दर (Onion Price)  प्रतिकिलो 100 च्या घरात असताना गोवा राज्यात आता सरकार रेशनकार्ड धारकांना कांदा स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याच्या तयारीमध्ये आहे. महाराष्ट्राच्या नाशिक कांदा बाजारातून कांद्याची खरेदी करून गोव्यात (Goa) तो रेशनकार्ड धारकांना (Ration Card Holders) सुमारे 32 रूपये प्रतिकिलो इतक्या माफक दरात उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती समोर आली आहे.

गोवा मंत्रिमंडळामध्ये बुधवारी महाराष्ट्रातून कांदा खरेदी करून तो रेशनकार्ड धारकांना स्वस्तात उपलब्ध करून देण्याच्या प्रस्ताव मंजुर झाला आहे. त्यानुसार आता नाशिकच्या National Agriculture Cooperative Marketing Federation (NAFED मधून गोवा सरकार अंदाजे 1,045 मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. गोव्यात हा कांदा पोहचल्यानंतर 3.5 लाख रेशनकार्ड धारकांना स्वस्त दरात म्हणजे प्रतिकिलो 32 रुपयांना उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा सरकार गरिबांसाठी प्रतिकिलि 32 रूपये दराने 3 किलो कांदा प्रत्येकासाठी उपलबद्ध करून देण्याच्या तयारीत आहे. दरम्यान राज्यात जसा कांदा येईल तशी त्याची माहिती गरजूंना जाहिरात, एसएमएस, सोशल मीडीया माध्यमातून दिली जाईल. त्यानंतर नागरिकांना रेशन दुकानातून हा कांदा खरेदी देखील करता येईल. नक्की वाचा: Kitchen Tips: कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येत असेल तर करा 'हे' उपाय; जाणून घ्या सोप्प्या किचन टिप्स.

दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणूक मर्यादा 25 टनावरून वाढवून दीड हजार टन एवढी करावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.