कर्नाटक: INS विक्रमादित्य युद्धनौकेला आग; एका नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू
कर्नाटक येथील कारवार येथील आयएनएस विक्रमादित्य जहाजाला आग लागली असून यात एका नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
कर्नाटकातील (Karnataka) कारवार (Karwar) येथील आयएनएस विक्रमादित्य (INS Vikramaditya) युद्धनौकेला आग लागली असून यात एका नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. बंदरामध्ये प्रवेश करीत असताना आयएनएस विक्रमादित्यला ऑनबोर्डवर आग लागली. लेफ्टनंट कमांडर डीएस चौहान (DS Chauhan) असे आगीत मृत झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
आग विझवण्याचा प्रयत्नात या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नात धुरामुळे चौहान यांची शुद्ध हरपली. त्यानंतर त्यांना तात्काळ नौदलच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला.
ANI ट्विट:
आयएनएस विक्रमादित्य ही युद्धनौका 20 मजल्यांची असून ती एखाद्या चालत्या फिरत्या किल्ल्याप्रमाणे आहे. 8 हजार टन हून अधिक भार घेण्याची नौकेची क्षमता आहे. 13 हजार किलोमीटर वेगाने ही युद्धनौका धावू शकते. ही युद्धनौका 1600 नौसैनिकांसह मिग-29-के लढावू विमान, कामोव-31, कामोव-28, सीकिंग, एएलएच ध्रुव आणि चेतक हेलिकॉप्टर शिवाय 30 विमाने आणि एन्टी मिसाईल प्रणालींनी सज्ज आहे.