North India Flood: उत्तर भारतात पुरामुळे जनजीवन विस्कळीत, हिमाचलमध्ये 54 मृत्यू

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये गेल्या 6 दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. या पावासामुळे अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

Himachal Pradesh Rain (Image Credit - ANI Twitter)

देशाच्या उत्तरेत पावसाचा थैमान हा सुरुच आहे. उत्तर भारतामध्ये पावसाचा (North India Rainfall) कहर सुरु आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे आलेल्या पूरामुळे (North India Flood) जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण बेपत्ता असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ (NDRF) आणि लष्कराच्या जवानांकडून (Army Jawan) शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.  (हेही वाचा - North India Rain: उत्तर भारतात पावसाचा थैमान, आत्तापर्यंत 37 जणांचा मृत्यू)

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये गेल्या 6 दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. या पावासामुळे अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचलमध्ये गेल्या 24 तासांत 39 ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. बियास नदीच्या प्रवाहामुळे अनेक घरं वाहून गेल्या आणि पूल देखील कोसळले आहेत.

देशांतील विविध राज्यांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. उत्तर प्रदेशमध्ये 34 जणांचा, हिमाचल प्रदेशमध्ये ५४ जणांचा, जम्मू-काश्मीरमध्ये 15 जणांचा, दिल्लीत 5 जणांचा आणि राजस्थान आणि हरियाणामध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये 92 जण जखमी झाले आहेत. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशमध्ये आतपर्यंत 4 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे आलेल्या पूरात उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. बुधवारपर्यंत उत्तरप्रदेशच्या 65 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान खात्याने काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement