घरातील विद्युतप्रवाह सुरु ठेवून केवळ दिवेच बंद करा; रुग्णालय, रस्त्यांवरील आणि अन्य आवश्यक सेवांमधील दिवे सुरु राहतील- ऊर्जा मंत्रालय
त्यासोबत रस्त्यांवरील दिवे, रुग्णालय वा अन्य अत्यावश्यक सेवांमधील विद्युत पुरवठा देखील सुरळीत सुरु राहील असेही ऊर्जा मंत्रालयाने सांगितले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे जनतेच्या मनात निर्माण झालेली निराशा दूर करून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्या म्हणजेच 5 एप्रिल ला रात्री 9.00 वाजता लोकांनी आपल्या घराच्या गॅलेरीतून किंवा दारातून दिवा प्रज्ज्वलित करण्यास सांगितले आहे. मात्र यावेळी आपले घरातील दिवे बंद करण्याचे आवाहनही केले आहे. मात्र असे सलग 9 मिनिटे देशभरातील दिवे बंद केल्यास त्याचा परिणाम तर वीज पुरवठा केंद्रातील यंत्रणेत बिघाड होण्याची शक्यता वर्तवली. हा बिघाड झाल्यास पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी साधारण आठवड्याचा कालावधी जाऊ शकतो, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Maharashtra Electricity Minister Nitin Raut) यांनी सांगितले होते. या सर्वाची पार्श्वभूमी लक्षात घेता भारत ऊर्जा मंत्रालयाने केवळ घरातील दिवेच (Lights, Tube Lights) बंद करा अन्य उपकरणांचा विद्युतप्रवाह सुरळीत राहील असे निर्देश दिले आहेत. त्यासोबत रस्त्यांवरील दिवे, रुग्णालय वा अन्य अत्यावश्यक सेवांमधील विद्युत पुरवठा देखील सुरळीत सुरु राहील असेही ऊर्जा मंत्रालयाने सांगितले आहे.
संपूर्ण देशातील वीजपुरवठा 9 मिनिटांसाठी बंद ठेवणे ही काही साधीसोपी गरज नाही. असे केल्यास हा वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी साधारण आठवड्याचा कालावधी लागू शकतो. असे ऊर्जा विभागाने माहिती दिल्यानंतर यावर सारासार विचार करत हा निर्णय घेण्यात आला आहे. असे होऊ द्यायचे नसल्यास नागरिकांनी सुरक्षित पर्याय म्हणून आपल्या घरातील वीज न घालवता आपल्या दारात किंवा खिडकीत दिवा लावावा असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले होते.
मात्र या सर्व बाबी लक्षात घरातील विद्युतप्रवाह खंडित न करता केवळ दिवेच बंद करावे अशा सूचना ऊर्जा मंत्रालयाने दिल्या आहेत. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अन्य सर्व अत्यावश्यक सेवांजवळील दिवे सुरु राहतील.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी केलेल्या थाळी वाजवा टाळी वाजवा आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आताही हे दिवे लावण्याचे आवाहन करताच अनेक विरोधकांनी सुद्धा याचे स्वागत केले आहे, कोरोनाच्या संकटामुळे जनतेच्या मनात निर्माण झालेली निराशा दूर करून मनोबल वाढवण्यासाठी हा उपक्रम आहे ज्यात आपल्या घराच्या गॅलेरीतून किंवा दारातून दिवा प्रज्ज्वलित करायाचा आहे. यासाठी कोणीही रस्त्यावर गर्दी करुन नका असेही मोदींकडून सांगण्यात आले आहे.