RBI: लवकरच येणार 20 रुपयांची नवी नोट, जाणून घ्या काय असतील ठळक वैशिष्ट्य

RBI तर्फे 20 रुपयांची नवीन नोट लवकरच चलनात लागू करण्यात येणार आहे, भारतीय ऐतिहासिक वास्तूंचा इतिहास गौरवणार RBI

New 20 Rupees Note (Photo Credits: RBI)

नवी दिल्ली: नव्याने चलनात आलेल्या रंगीत नोटांमध्ये आता हिरवट पिवळ्या रंगाची नवी 20 रुपयांची नोट (20 Rupees Note) देखील  पाहायला  मिळेल.  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India) ने  दिलेल्या माहितीनुसार 20 रुपयांच्या नव्या चलनावर एलोरा गुहांचे (Ellora Caves) प्रतीक छापण्यात येणार आहे. या माध्यमातून भारताच्या ऐतिहासिक वास्तूंचा गौरव करण्याचा हेतू असल्याचे सांगण्यात येतंय.

आरबीआय गव्हर्नर (RBI Governor) शक्तिकांता दास(Shaktikanta Das) यांच्या सहीने वैध नोटा काहीच दिवसात अर्थव्यवस्थेत लागू करण्यात येतील. RBI कडून 200 आणि 500 च्या नव्या नोटा लवकरच चलनात; पहा काय आहे नव्या नोटांची खासियत

20 रुपयांच्या नवीन नोटांसोबत जुन्या नोटाही कायदेशीर पद्धतीने वापरता येणार आहेत, असेही आरबीआयने केलेल्या अधिकृत विधानात स्पष्ट केले आहे. आरबीआयच्या माहितीनुसार,  31  मार्च 2016  पर्यंत 20 रुपयांच्या नोटांची संख्या 4.92 अरब एवढी होती. त्यामुळे मार्च 2018 पर्यंत 10 अरब झाली आहे.

एलोरा गुहांच्या प्रतीकासोबतच नेहमीची वैशिष्ट्ये जसे की, महात्मा गांधींची प्रतिमा, अशोक स्तंभ, स्वच्छ भारत लोगो,हे देखील नोटांपाहायला मिळणार आहे.