Mahashivratri 2019: नरेंद्र मोदी, अरुण जेटली, अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांनी दिल्या 'महाशिवरात्री'च्या शुभेच्छा
महाशिवरात्री उत्साह देशभरात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक बड्या नेत्यांनी ट्विट करत देशवासियांना महाशिवरात्रीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
Maha Shivratri 2019: आज (4, मार्च) महाशिवरात्रीचा मंगल, पवित्र दिवस. महाशिवरात्री उत्साह देशभरात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक बड्या नेत्यांनी ट्विट करत देशवासियांना महाशिवरात्रीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. वसंत ऋतुचे आगमन दर्शवणारा आणि अंधारावर, वाईटावर विजय मिळवणारी 'शिवाची महान रात्र' म्हणून महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. भारतातील या '6' भव्य शिवमंदिरात 'महाशिवरात्री'चा उत्सव असतो खास
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देखील या पवित्र दिवसाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील या शुभ क्षणांच्या शुभेच्छा दिल्या.
काँग्रेस प्रवक्ता रणदीप सिंग सेजरीवाला यांनी देखील ट्विट करत देश बांधवांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
हिंदू परंपरेनुसार, फाल्गुन महिन्याच्या 13 व्या रात्री आणि 14 व्या दिवशी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. आज देशभरात सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळेल. देशभरातील शिवमंदिरं भक्तांनी फुलून जातील. अनेक भक्तगण उपवास, व्रत, जप, जागरण अशा विविध माध्यमातून भगवान शिवाजी पूजा-प्रार्थना करतील.