Mumbai Weather Forecast For Tomorrow:मुंबईत उद्याचे हवामान कसे?जाणून घ्या हवामान अंदाज!

आजही पाऊस सातत्याने मुसळधार राहण्याची अपेक्षा आहे, दुपारनंतर अधिक पावसाची शक्यता आहे, सकाळच्या वेळी कमी.

Image Credit: Pixabay

Mumbai Weather Prediction,June28: पश्चिम उपनगरात आज आणखी पाऊस पडेल.भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD)आज मुसळधार ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवत यल्लो अलर्टचा इशारा जारी केला. नैऋत्य मान्सून पुढे सरकल्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दक्षिण मुंबईत काल रात्रभर अनेक भागात जोरदार पाऊस झाला. आजही पाऊसाचा जोर काल सारखा कायम रहाण्याची शक्यात आहे व दुपारनंतर पावसाचा जोर  अधिक होण्याची देखील शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD)आपल्या ताज्या मुंबई हवामान अपडेटमध्ये, गुरुवारी मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी पडतील व मधूनमधून ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) सांगितले की, आज दुपारी 4.03 वाजता मुंबईत सुमारे 4.36 मीटर उंचीची भरती येण्याची शक्यता आहे. आज रात्री 10.22 वाजता सुमारे 1.50 मीटर कमी समुद्राची भरतीओहोटी अपेक्षित असल्याचेही म्हटले आहे.मुंबईत आज 27 जून 2024 रोजी तापमान 28.24 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 26.99 °C आणि 28.73 °C दर्शवतो. आता उद्या नक्की मुंबईत हवामान कसे असतील ह्यासाठी हवामान खात्याने मुंबईत उद्याचे हवामान कसे असतील ह्याच  अंदाज लावला आहे. हेही वाचा:Kokan Weather Forecast For Tomorrow: कोकणचे उद्याचे हवामान कसे? पहा हवामान अंदाज!

 

भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) ने आपल्या ताज्या हवामान अंदाजात सांगितले की, नैऋत्य मान्सून पुढील ४-५ दिवसांत पश्चिम किनारपट्टीच्या काही भागांत आणि ईशान्य भारतामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.महाराष्ट्र ते कर्नाटक आणि केरळच्या उत्तरेकडील भागात वाऱ्याच्या मध्यम दबावाची रेषा तयार झाली आहे. त्यामुळे उत्तरेकडून जोरदार वारे वाहू लागले आहेत. तर यामुळेच अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif