Mumbai Water Crisis: मुंबईत आजपासून 10% पाणीकपात, BMC चे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

खरेतर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवार, 30 मे 2024 पासून 5 टक्के पाणीकपात आणि बुधवार, 5 जून 2024 पासून मुंबई मेट्रोमध्ये 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्टॉक शक्य तितक्या काळासाठी वापरला जाऊ शकतो.

Water | representative pic- (photo credit -pixabay)

Mumbai Water Crisis: मुंबईकरांना पुन्हा एकदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. खरेतर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवार, 30 मे 2024 पासून 5 टक्के पाणीकपात आणि बुधवार, 5 जून 2024 पासून मुंबई मेट्रोमध्ये 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्टॉक शक्य तितक्या काळासाठी वापरला जाऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, आज (25 मे 2024 नुसार ) मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये एकूण 1,40,202 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या 14,47,363 दशलक्ष लिटर प्रतिवर्षी आवश्यकतेच्या तुलनेत केवळ 9.69 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

मुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात

महापालिका प्रशासन पाणीसाठ्यावर बारकाईने लक्ष ठेवून दररोज नियोजनबद्ध पद्धतीने पाणीपुरवठा करत आहे. जोपर्यंत समाधानकारक पाऊस पडत नाही आणि जलसाठ्यातील उपयुक्त साठा होत नाही तोपर्यंत पाणीकपात कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मुंबईकरांनी घाबरण्याची गरज नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाने सर्व नागरिकांना नम्रपणे आवाहन केले आहे की, पाणी बचतीचे उपाय अवलंबुन मुंबईकरांनी पाण्याची जास्तीत जास्त बचत करावी, पाणी काटकसरीने वापरावे आणि महापालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे.