Forbes List of India's 10 Richest Billionaires: फोर्ब्सच्या भारतातील Top 10 सर्वात श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीत Mukesh Ambani अव्वल, Gautam Adani यांना मिळाले दुसरे स्थान (See List)

2021 पर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजचे निव्वळ कर्ज शून्यावर आणण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी त्यांनी, 35 अब्ज डॉलर्सची कमाई केली'

Mukesh Ambani | Reliance Jio | Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: File Photo)

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी पुन्हा एकदा फोर्ब्सच्या भारतातील पहिल्या 10 अब्जाधीशांच्या यादीत (Forbes List of India's 10 Richest Billionaires) अव्वल स्थान मिळवले आहे. 5 मार्च 2021 पर्यंत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 84.5 अब्ज डॉलर्स इतकी आहे. उल्लेखनीय म्हणजे, फोर्ब्सच्या 35 व्या वार्षिक जगातील अब्जाधीशांच्या यादीमध्ये (Forbes’ 35th Annual World’s Billionaires Lists) मुकेश अंबानी 10 व्या स्थानावर आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या चेअरमननंतर गौतम अदानी (Gautam Adani) आणि शिव नादर (Shiv Nadar) यांचा क्रमांक लागतो.

फोर्ब्सने म्हटले आहे, 'कोविड-19 साथीच्या काळात, अंबानी यांनी आपल्या कंपन्यांसाठी मोठा निधी उभारणीची कामगिरी केली. 2021 पर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजचे निव्वळ कर्ज शून्यावर आणण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी त्यांनी, 35 अब्ज डॉलर्सची कमाई केली.' गुगल आणि फेसबुक सारख्या जागतिक गुंतवणूकदारांनी जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. अंबानींच्या मालकीच्या कंपनीत फेसबुकचा 9.99 टक्के हिस्सा आहे.

अंबानीच्या पाठोपाठ अदानी ग्रुपचे गौतम अदानी यांचा नंबर लागतो. 2021 मध्ये अदानी यांची संपत्ती पाच पटीने वाढली आहे. कोविड-19 च्या साथीच्या रोगात गौतम अदानी 42 अब्ज डॉलर्सनी अधिक श्रीमंत झाल्यामुळे या यादीमध्ये ते दुसर्‍या क्रमांकावर आहेत. कोळसा खाणी व्यतिरिक्त बंदरे, विमानतळ जोडून अदानी आपल्या समूहाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करीत आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अदानीने 74 टक्के भागभांडवल संपादन केले आहे.

एचसीएल टेक्नोलॉजीज लिमिटेडचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष शिव नादर तिसऱ्या क्रमांकावर आहेत, तर राधाकिशन दमानी भारतातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत आहेत. नुकतेच दमानी आणि त्यांच्या भावाने दक्षिण मुंबईत तब्बल 1,001 कोटी रुपयांमध्ये दोन मजली इमारत विकत घेतली आहे. दमानीची सुपरमार्केट चेन डीमार्टचे देशभरात 221 स्टोअर्स आहेत.

पुढे उदय कोटक पाचव्या क्रमांकावर आहे. लक्ष्मी मित्तल, कुमार बिर्ला आणि सायरस पूनावाला अनुक्रमे सहाव्या, सातव्या आणि आठव्या स्थानावर आहेत. सन फार्मास्युटिकल्सचे संस्थापक दिलीप शघनवी हे नववे श्रीमंत भारतीय आहेत. भारती एंटरप्रायजेसचे अध्यक्ष सुनील मित्तल आणि त्यांचे कुटुंबीय फोर्ब्स इंडियाच्या सर्वात श्रीमंत यादीत दहाव्या स्थानावर आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif