मिराज 2000 लढाऊ विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू
मिराज 2000 हे लढाऊ विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.
मिराज 2000 हे लढाऊ विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. बंगळूरुतील एचएएलच्या विमानतळावर शुक्रवारी (1/2/2019) ही घटना घडली. विमानाला आग लागल्याने दोन्ही वैमानिकांनी पॅरॅशूटच्या साहाय्याने उडी मारली. मात्र त्यापैकी एक वैमानिक कोसळलेल्या विमानावरच पडल्याने त्याचा जागीत मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान दुसऱ्या वैमानिकाने प्राण सोडले.
नेगी आणि अबरोल अशी त्यांची नावे असून दोघेही वैमानिक प्रशिक्षणार्थी होते. याप्रकरणी हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले आहेत. एचएएलद्वारे अद्ययावत करुनही विमान अपघात झाल्याने चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे हवाई दलाने स्पष्ट केले आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने मिराज 2000 या लढाऊ विमानाची निर्मिती हवाई आणि नौदलातील वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी केली होती.