मध्य प्रदेश: हॉस्पिटलचं बिल भरलं नाही म्हणून 80 वर्षीय वृद्ध रुग्णाला बेडवर दोरीने बांधून ठेवलं; मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले चौकशीचे आदेश
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी सुद्धा या प्रकरणात दोषी आढलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एका खासगी रुग्णालयात एका कुटुंबातील 80 वर्षीय व्यक्तीला बेडवर दोरीने बांधून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे . या मागचे कारण तर अक्षरशः विश्वास न बसण्यासारखे आहे. या वृद्धांच्या कुटुंबाला हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी उशीर होत असल्याने हॉस्पिटल प्रशासनाकडून असे विकृत कृत्य केले गेले असे समजत आहे. राज्यातील शाजापूर (Shajapur) जिल्ह्यात ही निर्घृण घटना घडली आहे. रुग्णालयाचे बिल न भरल्यामुळे त्या व्यक्तीला रुग्णालयाच्या पलंगाशी बांधून ठेवण्यात आले होते. ही घटना उघडकीस येताच जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक पथक रुग्णालयात पाठवले आहे. तसेच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी सुद्धा या प्रकरणात दोषी आढलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, पोटाशी संबंधित समस्येमुळे संबंधित 80 वर्षीय व्यक्तीला शाजापूर जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. जेव्हा कुटुंबातील सदस्य रुग्णालयाचे बिल भरण्यास असमर्थ असल्याचे कळले तेव्हा रुग्णास रुग्णालयाच्या बेडवर बांधण्यात आले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनिवारी या घटनेची दखल घेत दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले.
ANI ट्विट
शिवराज सिंह चौहान ट्विट
दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शुद्ध या घटनेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्यक्तीच्या मुलीने हॉस्पिटल प्रशासनावर निर्घृण कृत्य केल्याचा आरोप लगावला आहे, मध्य प्रदेश सरकारने यात लक्ष घालावे असे कमलनाथ यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे.
कमलनाथ ट्विट
दरम्यान, या प्रकरणाची सोशल मीडियावर सुद्धा बरीच चर्चा आहे. माध्यमाच्या माहितीनुसार या वृद्ध रुग्णाच्या मुलीने शुक्रवारी हॉस्पिटल प्रशासनाला आपल्या वडिलांना डिस्चार्ज देण्याची विनंती केली होती, आपण हळूहळू पैसे परत देऊ असेही या मुलीने सांगितले होते, मात्र हॉस्पिटल तर्फे जोपर्यंत पूर्ण पेमेंट होत नाही तोपर्यंत डिस्चार्ज देण्यास नकार देण्यात आला. शेवटी मुलीने आपण पैसे भरण्यास असमर्थ असल्याचे सांगितल्याने हॉस्पिटलच्या कर्मचार्यंनी तिच्या वडिलांना बेडवर बांधून ठेवले.