Lip-Lock Challenge in Karnataka: मंगळूरू मध्ये खाजगी निवासस्थानी Kissing Challenge करणार्‍या 8 विद्यार्थ्यांना POCSO Act अंतर्गत अटक

विद्यार्थ्यांनी lip-lock competition ही त्यांनी truth and dare game दरम्यान घेतल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिस

कर्नाटक पोलिसांनी 8 विद्यार्थ्यांना Pocso Act अंतर्गत अटक केली आहे. मंगळूरू मध्ये खाजगी निवासस्थानी kissing challenge आयोजित केले होते. सोशल मीडीयामध्ये स्मुचिंग करण्याचे व्हिडिओ पहायला मिळाले. यामुळे सोशल मीडीयामध्ये या व्हिडिओची चर्चा रंगली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी फ्लॅट दोन महिन्यांसाठी घेतला होता. गर्लफ्रेंड्स सोबत त्यांनी truth and dare खेळ खेळत होते. त्यामध्ये त्यांनी लिप लॉक केले. त्याचे व्हिडिओ सध्या चर्चेमध्ये आहेत. आणि पालकांमध्ये यामुळे चिंता वाढली आहे.

Pandeshwara Women police station मध्ये विद्यार्थ्यांविरूद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शूट केलेल्या एका विद्यार्थ्यानेच तो वायरल केला आहे. सुरूवातीला त्याला ताब्यात घेतले होते. नंतर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर अन्य तिघांनाही ताब्यात घेतले आहे.नक्की वाचा: Crime: विद्यार्थिनींची छेड काढल्याप्रकरणी सरकारी शाळेतील शिक्षकावर गुन्हा दाखल .

एक आरोपी विद्यार्थी परदेशातही पळून गेला आहे. सध्या पोलिसांनी शाळा, कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकरणामध्ये त्यांना सहकार्य करण्याचे देखील आवाहन पोलिसांनी केले आहे.

N. Shashikumar या मंगलूरूच्या पोलिस कमिशनरांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार 6 महिन्यांपूर्वीचा असल्याचं म्हटलं आहे. lip-lock competition ही त्यांनी truth and dare game दरम्यान घेतल्याचं म्हटलं आहे.

एका मुलाने व्हॉट्सअ‍ॅप वर आठवडाभरापूर्वी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. शाळेकडून या विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ करणारे विद्यार्थी एका प्रतिष्ठित कॉलेज मधील आहेत. ही मुलं ड्रग्स घेत होती का? याचा देखील तपास पोलिसांकडून करण्यात आला आहे.