Kohinoor: कोहिनूर लवकरचं भारतात परत आणला जाणार? भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रीया
ब्रिटनच्या राणी एलिजाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर भारतात कोहिनुर वापसीच्या चर्चांना उधाण आलं. भारत सरकारकडून यावर मात्र कुठलीही टिपण्णी केल्या गेली नाही. पण आता जवळपास महिनाभरानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने यावर आपली पहिली प्रतिक्रीया नोंदवली आहे.
ब्रिटनच्या राणी एलिजाबेथ द्वितीय (Britain Queen Elizabeth II Death) यांच्या निधनानंतर भारतात (India) कोहिनुर (Kohinoor) वापसीच्या चर्चांना उधाण आलं. भारतात कोहिनुर परत आणा अशी मागणी किंवा कोहिनुर परत कधी आणणार असा सवाल विचारला जावू लागला. सोशल मिडीयावर (Social Media) तर ब्रिंग बॅक कोहिनुर (Bring Back Kohinoor) असा हॅशटॅग (Hashtag) देखील ट्रेण्ड (Trend) होवू लागला. भारत सरकारकडून (Indian Government) यावर मात्र कुठलीही टिपण्णी केल्या गेली नाही. पण आता जवळपास महिनाभरानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (Indian Foreign Ministry) यावर आपली पहिली प्रतिक्रीया नोंदवली आहे. संबंधीत माहिती पीटीआय कडून देण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते अरिंदम बागची (Arindam Bagchi) यांना कोहिनूर हिरा परत आणण्याच्या मागणीवर भाष्य केले आहे.
अरिंदम बागची (Arindam Bagchi) यांना कोहिनूर हिरा (Kohinoor Diamond) परत आणण्याच्या अलीकडील मागण्यांबद्दल सवाल विचारला असता बगाची म्हणाले सरकार यावर समाधानकारक तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहे तरी देशवासियांच्या मागणीचा मान राखून नक्कीच मार्ग शोधल्या जाईल, अशी प्रतिक्रीया परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे. (हे ही वाचा:- Global Hunger Index: जागतिक भूक निर्देशांकात भारत 101 वरुन 107 व्या क्रमांकावर घसरला; पाकिस्तान, नेपाळ क्रमवारीत वरचढ)
बागची कोहिनुरबाबत बोलताना त्यांनी काही वर्षांपूर्वी संसदेत सरकारच्या चर्चेचा संदर्भ देत म्हणाले, भारत सरकारने काही वर्षांपूर्वी संसदेत याला प्रतिसाद दिला होता. आम्ही ब्रिटन सरकारकडे (Britain Government) वेळोवेळी हा मुद्दा उपस्थित करत आहोत आणि आम्ही यावर लवकरच समाधानकारक मार्ग शोधून काढू.परराष्ट्र मंत्रालयाने कोहिनुरबाबत केलेलं हे भाष्य अत्यंत महत्वाचं आहे. कारण यातून लोकांच्या मागणीची दखल घेण्याचा प्रयत्न होत आहेत हे नाकारता येणार नाही. तरी अरिंदम बागची यांच्या या प्रतिक्रीयेनंतर कोहिनुर आता लवकरच भारतात परतणार का या चर्चांना उधाण आलं आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)